शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली संघाच्या शिबिराची प्रतिकृती

By admin | Updated: November 12, 2015 02:21 IST

इतिहासप्रेमी मंडळातर्फे यंदा रमणबाग शाळेच्या मैदानावर आगळीवेगळी कलाकृती उभी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या पश्चिम

पुणे : इतिहासप्रेमी मंडळातर्फे यंदा रमणबाग शाळेच्या मैदानावर आगळीवेगळी कलाकृती उभी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या पश्चिम प्रांताच्या शिबिरस्थानाची रचना या ठिकाणी उभारण्यात आली आहे. ३ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यांतील संघाचे स्वयंसेवक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाची भव्यदिव्यता दाखविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती तयार केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले. यामध्ये किल्ल्याला ज्याप्रमाणे तटबंदी असते तशा प्रकारचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक बनविले आहे. तसेच, या शिबिरामध्ये २०० फुटांचे व्यासपीठ असणार आहे त्याच पद्धतीने ३० फुटंचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच संघाच्या गणवेशातील ८०० स्वयंसेवकांच्या मूर्ती तयार करून त्या स्वयंसेवकांमध्ये ज्याप्रमाणे शिस्त असते त्याच पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष या शिबिरामध्ये १ लाख स्वयंसेवक सहभागी होतील, असे उद्दिष्ट आहे. हे शिबिर ऐतिहासिक होणार असून, त्याची भव्यता लक्षात येण्यासाठी या वर्षी हा प्रकल्प उभारला आहे. बारा वर्षांपासून इतिहासप्रेमी मंडळातर्फे रमणबाग शाळेच्या मैदानावर दिवाळीदरम्यान विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या कलाकृती करीत आहेत. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे शेटे यांनी सांगितले. या प्रकल्पाची सर्व माहिती शालेय विद्यार्थी देत असून, ते येत्या १५ तारखेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि ४ ते रात्री ९ या वेळात नागरिकांसाठी खुले असेल.