शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत विद्यार्थी हरित सेना

By admin | Updated: March 27, 2017 03:29 IST

राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमांतर्गत अस्तित्वातील शाळांमधील इको क्लबचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील

पुणे : राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमांतर्गत अस्तित्वातील शाळांमधील इको क्लबचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील ८८०७ शाळांमध्ये विद्यार्थी हरित सेना निर्माण केली जाणार असून, या शाळांमधील इको क्लबसाठी प्रतिशाळा २५०० रुपयांप्रमाणे २ कोटी २० लाख १७ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता हे आव्हान असून, बहुतेक समस्यांचे मूळ पर्यावरणविषयक प्रवृत्तींमध्येच दडलेले आहे. लहान मुले संस्कारक्षम असून त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक गोडी व जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे काही उपक्रम राबविले जातात. जानेवारी २००७ पासून या योजनेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून राबविण्यात आले.पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या कामात मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणे, त्यांच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण असलेली संवेदनशील नवी पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे काम या योजनेत करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यात केंद्र शासनातर्फे मिळणाऱ्या सहायक अनुदानातून राष्ट्रीय हरित सेना योजना प्रत्येक जिल्ह्यातील २५० शाळांमधून राबविली जाते. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रतिशाळा २५०० रुपये अनुदान मिळत असते. हे अनुदान अत्यल्प असल्याने अन्य शाळांमध्ये ठोस कार्यक्रम घेण्यात अनुदानाची कमतरता भासत होती.या शाळांमधील इको क्लबसाठी प्रतिशाळा २५०० रुपयांप्रमाणे २ कोटी २० लाख १७ हजार रुपये अनुदान दिले जाणार असून, पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या कामात मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणे, त्यांच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती करणे याबरोबरच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीजसंकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्षलागवड, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचतीबाबत जागरूकता, पर्यावरणदिन व सणांचे औचित्य साधून जनजागृती करणे आदी उपक्रम राबविले जाणे शासनाला अभिप्रेत आहे. (प्रतिनिधी)