शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: September 1, 2016 02:07 IST

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. स्कूलबसचा परवाना नसलेल्या खासगी बसमधूनच बहुतेक शाळांमधील विद्यार्थी प्रवास करत आहेत

पुणे : विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. स्कूलबसचा परवाना नसलेल्या खासगी बसमधूनच बहुतेक शाळांमधील विद्यार्थी प्रवास करत आहेत. अनेक शाळांमध्ये अद्याप परिवहन समित्यांची स्थापना झालेली नाही. प्रत्येक स्कूलबसमध्ये महिला सहायक असणे बंधनकारक आहे. मात्र, शाळा व स्कूलबस कंत्राटदाराकडून या नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने नियमावली तयार केली असून, सर्व शाळांनी स्कूलबस वाहतुकीच्या या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पुण्यातील नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांवर स्कूलबस चालक व वाहकांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे स्कूलबसमध्ये महिला सहायक असण्याच्या मागणीने जोर धरला. परिणामी काही बसमध्ये आता महिला सहायक ठेवण्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले असले तरी अजूनही काही स्कूलबसमध्ये महिला सहायक नसल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना आढळले.प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करणे आवश्यक असून, तीन महिन्यांतून एकदा आणि प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी या समितीच्या बैठकीचे आयोजन करणे गरजेचे आहे. याबाबत नागपूर खंडपीठाने याबाबत स्वत:हून दखल घेऊन समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. परंतु, शाळा, पालक व स्कूलबस कंत्राटदारांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर आले. काही शाळांमध्ये समित्या स्थापन झाल्या असल्या तरी या समित्यांच्या बैठका घेतल्या जात नसल्याचे काही पालकांनी सांगितले.शहरातील काही नामांकित शाळांनी अद्याप विद्यार्थी वाहतुकीबाबत कोणालाही कंत्राट दिलेले नाही. परिणामी या शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी बस किंवा रिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे. पूर्ण पिवळ्या रंगाच्या व विटकरी पट्टा असणाऱ्या वाहनांना स्कूलबसचा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला जातो. मात्र, खासगी पांढऱ्या रंगाच्या वाहनांमधून सर्रासपणे विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पिवळ्या रंगांच्या वाहनांवर विटकरी रंगाचा पट्टा नव्हता. तसेच शाळेचे नावही लिहिलेले नव्हते. त्याचप्रमाणे स्कूलबस असाही उल्लेख नव्हता. विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारापासून स्कूलबसपर्यंत आणण्यासाठी तसेच बसमध्ये चढवून घरापर्यंत सोडण्यासाठी बसमध्ये महिला सहायक ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, शहरातील पुणे स्टेशन, येरवडा, वारजे, सिंहगड रस्ता आणि शहरातील मध्य भागातील शाळांची पाहणी केली. त्यात काही स्कूलबसमध्ये महिला सहायक असल्याचे दिसून आले. तर काही स्कूलबस महिला सहायकाशिवाय विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)आरटीओकडे बसची नोंदणी नाहीकर्वेनगरमधील मुलींच्या एका नामवंत शाळेच्या कोणत्याही बसमध्ये अथवा व्हॅनमध्ये महिला सहायकाची सुविधा उपलब्ध नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असताना शाळेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही बसची आरटीओ नोंदणीही न झाल्याचे ‘लोकमत पाहणी’तून समोर आले आहे. आरटीओ नोंदणी झाली नसल्याने बस शाळेच्या आवारात लावण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसमधून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, शिवणे परिसरातील काही शाळांच्या बसचालकांशी संपर्क साधला असता, शासनाच्या नियमानुसार, छोट्या व्हॅनसाठी महिला सहायकाची आवश्यकता नाही, असे त्याने सांगितले.कर्वेनगर परिसरातील काही शाळांमध्ये महिला सहायक नेमण्याचा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे. बस तसेच व्हॅनमध्ये एक महिला आणि एक पुरुष सहायक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतात. विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार महापालिका क्षेत्रात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त असू नये. तर पालिका हद्दीबाहेर ही वेगमर्यादा ताशी ५० किमी इतकी आहे. मात्र, शहरात काही स्कूलबस तसेच व्हॅनचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. वाहनामध्ये विद्यार्थी असतानाही चालक रस्त्यावर फारशी वाहतूक नसली की वाहन जोरात दामटतात. काही शाळांमध्ये विद्यार्थी उशिरा आल्यानंतर शाळेत प्रवेश दिला जात नाही किंवा मग शिक्षकांची बोलणी खावी लागतात. या कारणास्तवही वाहनचालकांकडून शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी वाहने वेगात नेली जातात. रस्त्यावरील वाहतूक सिग्नल पाळतानाही काही वाहने दिसत नाहीत. सिग्नल तोडून गर्दीतून वाट काढत ते विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालताना दिसतात. सहायक का आवश्यक ? बहुतेक शाळांमधील लहान विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल व्हॅनमधून केली जात आहे. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी एकदाच शाळेबाहेर येत नाहीत. त्यामुळे व्हॅनचा चालक प्रथम शाळेबाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये बसवतो आणि दुसऱ्या मुलांना आणण्यासाठी निघून जातो. या वेळी व्हॅनमधील मुले खाली उतरून रस्त्यावर जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्येक स्कूलबसला सहायक असणे गरजेचे आहे.शाळा-वाहतूकदारांमध्ये होईना ‘सामंजस्य’शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी संबंधित शाळा आणि वाहतूकदारांमध्ये सामंजस्य करार होणे आवश्यक आहे. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यास करारामुळे त्याची जबाबदारी कोण घेणार या भीतीपोटी हा करार न करताच तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचा वाहतूक परवाना न घेताच शहरात विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. अशा सुमारे ८00 वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहनधारक आणि शाळांमध्ये हा करार होणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून संबंधित करार वाहतूक परवाना घेताना बंधनकारक आहे. मात्र, शाळांकडून हे करार करण्यास नकार दिला जात असल्याच्या वाहतूकदारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे करार न झाल्याने अनेक वाहतूकदारांना परवानेच मिळालेले नाहीत. मात्र, त्यानंतरही शहरात शालेय विद्यार्थी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे.