शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. समाजमाध्यम आणि सरकारकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

एमपीएससीतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे. राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परीक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश, बिहारने विविध खात्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय जल मार्ग विभागाने नॅव्हिगेशनल असिस्टंट व टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमपीएससी समन्वय समितीने कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा पुढे ढकलण्याची असल्याचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. आता विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर ‘हॅश टॅग पोस्टपोंड एमपीएससी’ अशी मोहीम सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

--

मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेनंतर अनेकांना कोरोना झाला. काहींचे आई, वडील, बहीण, आप्त कोरोनाबाधित आहेत. अनेक जण अकरा एप्रिलची परीक्षा देता यावी यासाठी अंगावर आजार काढत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी.

- निकिता शिरिते, विद्यार्थी

--

माझ्या रूममधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही मुली आजारी आहेत. जवळपास तीस टक्के मुले आजारी आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी.

- सारिका चोले, विद्यार्थी

--

ट्विटर प्रतिक्रिया

सद्यस्थिती लक्षात घेऊन ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.

- कमलाकर शेटे,

--

राज्यातील तीस टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास आमचे व आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो. महाराष्ट्रासाठी हा सायलेंट बॉम्ब ठरेल.

-दीपेश मोरे, विद्यार्थी