शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांवर ताण

By admin | Updated: November 12, 2015 02:39 IST

शासननियुक्त त्रिसदस्यीय समितीने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डिसी रूल) २०१५ मध्ये एफएसआयची खैरात करून, उंच इमारतींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याची शिफारस केली आहे.

पुणे : शासननियुक्त त्रिसदस्यीय समितीने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डिसी रूल) २०१५ मध्ये एफएसआयची खैरात करून, उंच इमारतींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज लाइन, वीज या पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडणार आहे. या तरतुदींचा फायदा उठविण्यासाठी वेगाने बांधकामे सुरू होतील; मात्र त्यावेगाने पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्यास अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डिपी) बनविण्याची महापालिकेची मुदत संपल्यामुळे राज्यशासनाने तो ताब्यात घेऊन त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीकडे सोपविली होती. त्यानुसार मंगळवारी त्यांनी डिसी रूलबाबतच्या शिफारशी शासनाकडे सादर केल्या. यामध्ये शहरामध्ये बांधकामासाठी साडेतीन एफएसआय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मेट्रोच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ एफएसआयचा लाभ मिळणार आहे. शासकीय व निमशासकीय इमारतींना एसआयची कोणतीही मर्यादा असणार नाही. टीडीआरसाठी पूर्वी टाकण्यात आलेले झोनचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. २४ मीटर रुंदीचा रस्ता असल्यास इमारतींच्या उंचीवर कोणतीही मर्यादा असणार नाही, अशा प्रमुख शिफारसी करण्यात आल्या आहेत.वाढीव एफएसआयचा लाभ उठविण्यासाठी शहराच्या मध्यवस्ती मध्येच; तसेच प्राइम लोकेशन असणाऱ्या भागांमध्ये पुनर्विकासाची कामे वेगाने हाती घेतली जाणार आहेत. टीडीआरबाबत असलेली झोनची मर्यादा काढण्यात आल्याने कुठूनही टीडीआर खरेदी करून, तो या भागात वापरता येऊ शकणार आहे. यामुळे गगनचुंबी इमारती उभ्या राहून विशिष्ट भागांमधील लोकसंख्येत प्रचंड वाढ होणार आहे. शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. आता पुन्हा याठिकाणची लोकसंख्या वाढल्यास पर्यायाने वाहतूककोंडीत आणखी भर पडणार आहे. मध्यवस्तीमध्ये रस्त्यासाठी जागा देण्यास प्रचंड विरोध होत असल्याने, रस्तारुंदीकरणास अनेक मर्यादा असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या भक्कम सार्वजनिक व्यवस्थेच्या (लोकल व बेस्ट) तुलनेत पुण्याची पीएमपी खूपच कुचकामी आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यात गगनचुंबी इमारत उभारताना वाहतूक कोंडीच्या प्रश्नातून कसा मार्ग काढणार, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. शहरातील ड्रेनेज लाइन ही खूपच जुनी असल्याने, ती बदलण्यासाठीही मोठा खर्च प्रशासनाला करावा लागणार आहे. त्याचबरोबर उद्याने, हॉस्पिटल, शाळा सुविधाही लागणार आहेत.मेट्रोच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ एफएसआयचा लाभ मिळणार आहे. शासकीय व निमशासकीय इमारतींना एसआयची कोणतीही मर्यादा असणार नाही. टीडीआरसाठी पूर्वी टाकण्यात आलेले झोनचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. २४ मीटर रुंदीचा रस्ता असल्यास इमारतींच्या उंचीवर कोणतीही मर्यादा असणार नाही, अशा प्रमुख शिफारसी केल्या आहेत.