शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाणीउपसा थांबवा!

By admin | Updated: May 22, 2014 06:07 IST

हूला पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील शेताला पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने प्रतिबंध करून पाणी उपसा थांबवावा,

देहूगाव : देहूला पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील शेताला पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने प्रतिबंध करून पाणी उपसा थांबवावा, असा आदेश प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना दिला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीची आढावा बैठक प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाली. समस्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या येथे जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यात्राकाळात जीवन प्राधिकरणने योग्य ती काळजी घेऊन टीसीएल पावडर, क्लोरिनेशन व्यवस्था करावी. माळीनगर व देहूगावातील सुतारआळी भागात नवीन जलवाहिन्यांना टाकाव्यात. त्या तातडीने कार्यान्वित करून पाण्याची गळती थांबवावी, अशा सूचना अधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत. शासनाच्या वतीने पाण्याचे टॅँकर, फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पराळे म्हणाले, गाथा मंदिर रस्ता येथे दुरूस्तीची कामे सुरू आहेत. गावातील भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. वैकुंठगमन गोपाळपुरा मंदिराच्या भागात उघड्यावर विद्युत वाहिन्या आहेत. काही ठिकाणी त्या खाली आलेल्या आहेत. याची दुरूस्तीची कामे प्राधान्याने करावीत. गावातील उघड्यावर असलेल्या डीपी हलवावी अथवा त्याच्याभोवती संरक्षक कठडे उभे करून धोकादायक असल्याची सूचना लावावी व यात्रा काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे बर्गे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीला पाणी सोडण्यात येणार असून, त्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती पाटनिरीक्षक एकनाथ नलावडे यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या काळात वहातूक पोलीस जास्त मागविण्यात येणार असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असला, तरी पालखी प्रस्थानच्या वेळी व पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होत असताना रस्त्यावर व अनगडशहा अली दर्ग्याजवळ गर्दी अथवा चेंगराचेंगरी होणार नाही यासाठी योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना बर्गे यांनी केल्या. ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे पालखी समवेत येणारी वाहने तळवडेमार्गे वळविण्यात येतील. (वार्ताहर)