खेड-शिवापूर : खेड-शिवापूर टोलनाका येथे राष्टÑीय हमरस्त्यावर महायुतीच्या (शिवसेना, भाजपा, स्वाभिमानी संघटना, रासप व आरपीआय) वतीने रास्ता रोको आंदोलन अगदी सांप्रदायिक पद्धतीने कुठल्याही प्रकारची तोडफोड व गाड्या न अडवता करण्यात आले. शिंंदेवाडी ते सारोळा या हमरस्त्यावर नियमित होणार्या अपघाताबाबत व अत्यंत मंद गतीने चालू आहेत. गावोगावी असलेले ओव्हरब्रीज, सर्व्हिस रोड ही कामे प्रलंबित असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डयांमुळे या महामार्गावर सतत अपघात होतात. अत्यंत गंभीर अपघात होऊनही शासनाची याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. या अतिशय गंभीर बाबींकडे डोळेझाक करणार्या शासनाला जाग यावी या हेतूने महायुतीने खेडशिवापूर टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी १० वाजता आंदोलन विजय शिवतारे, भिमराव तापकीर, शरद ढमाले, रमेश कोंडे, कुलदिक कोंडे, अमोल पांगारे, गणेश बागल, रोहिणीताई बागल व शोभाताई पासलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे सकाळी १० वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी १.३० वाजता निवेदन देऊन संपविण्यात आले. या आंदोलनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये आणि आंदोलनाला हिंंसक वळण लागू नये म्हणून खेडशिवापूरला भोर, राजगड, हवेली, वेल्हा, जेजुरी व सासवड पोलिस स्टेशनचे संबधित पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस जवान, अतिरिक्त पोलिस फोर्स तळ ठोकून होता. शिवाय मुख्यालयाची आणि सासवड पोलिस उपअधीक्षक मुख्यालयाच्या दोन पोलिस व्हॅन आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित केल्या होत्या. (वार्ताहर)
टोलनाक्यावर रास्ता रोको
By admin | Updated: May 31, 2014 07:19 IST