शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे मोबाईल घेणारा अटकेत

By admin | Updated: October 14, 2016 05:11 IST

कल्याणीनगर येथील रिलायन्स डिजिटल कंपनीतील सव्वा दोन लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक

पुणे : कल्याणीनगर येथील रिलायन्स डिजिटल कंपनीतील सव्वा दोन लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक केली आहे़ सलमान महमंद पटेल (वय २४, रा़ साईबाबानगर, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे़ मोबाईल चोरणाऱ्या इस्लाम लायकअली तांबोळी (वय २५, रा़ गांधीनगर, येरवडा) याला यापूर्वीच अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे़ याप्रकरणी शामलिया अनुग्रह कुमार (वय ३३, रा़ आंबेगाव पठार, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे़ तांबोळी हा रिलायन्स डिजिटल कंपनीत नोकरीस असताना स्टोअर मॅनेजर काही दिवस सुटीवर असताना त्याच्याकडे कार्यभार देण्यात आला होता़ त्या काळात त्याने १३ मोबाईल, रोटर, मोमरी कार्ड, पेनड्राईव्ह असा २ लाख २१ हजार ६५१ रुपयांच्या मालाचा अपहार केला़ स्टोअरचे अ‍ॅडिट करीत असताना हा अपहार केल्याचे दिसून आले़ तांबोळी याला अटक करुन तपास केला असता त्याने चोरलेले मोबाईल सलमान पटेल याला विकल्याचे सांगितले़ त्यावरुन सलमान पटेल याला अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले़ सरकारी वकील वामन कोळी यांनी न्यायालयास सांगितले की, पटेल याने हे मोबाईल चोरीचे असल्याचे माहित असतानाही विकत घेतले असून ते कोणाला विकले याचा शोध घेऊन ते हस्तगत करायचे आहेत़ मोबाईल विक्री करुन मिळालेले पैसे जप्त करायचे आहेत़ त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे़ न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरुन पटेल याला १४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़