शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी कोट्याला अजूनही प्रचंड मागणी

By admin | Updated: November 15, 2015 01:13 IST

रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि

पुणे : रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध झाला असला तरी रेल्वेच्या व्हीआयपी कोट्याची मागणी अजूनही तशीच असल्याचे या दिवाळीत दिसून आले़ दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तत्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. अनेक प्रवाशांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ‘व्हीआयपी सेटिंग’ करण्यावर भर दिल्यामुळे ‘डीआरएम’ कार्यालयात येणाऱ्या व्हीआयपी कोट्याच्या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आली. एकट्या पुणे -जम्मूतावी झेलम एक्सप्रेसला १२ जागांच्या कोट्यासाठी १०० हून अधिक अर्ज दिवाळीच्या काळात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली़ पुणे विभागातून दररोज साधारण ८०० जागांचा कोटा असतो़ पण सणाच्या काळात त्यात इतकी प्रचंड वाढ होती, की आमचाही नाईलाज होतो़ त्यामुळे एकाला जागा दिली की, दुसरे नाराज होतात, त्यातून अनेक जण मनात राग धरुन बसतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले़दिवाळीच्या अगोदर आपापल्या गावी जाण्यासाठी सर्वांनाच घाई होती़ अनेक प्रवासी तत्काळच्या रांगेत उभे होते. तत्काळमध्येही वेटिंगचे तिकीट हाती पडल्यामुळे अनेक प्रवाशांची निराशा झाली. पुण्याहून दिवसाकाठी १४० हून अधिक रेल्वेगाड्या धावतात. पुणे, कोल्हापूर, मिरज येथून सुटणाऱ्या गाड्यांमधील व्हीआयपी कोट्यातून जागा मिळण्यासाठी अनेक प्रवाशांनी राजकीय नेत्यांच्या लेटरपॅडवर अर्ज करणे सुरू केले होते़ दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडयांमागे साधारणत: १५० ते १७५ अर्ज व्हीआयपी कोट्यासाठी येतात.मात्र, त्या गाड्यांमध्ये केवळ १० ते १२ आसने उपलब्ध असतात. इतर भागांकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी ७० ते ८० अर्ज असतात. त्यामुळे व्हीआयपी कोट्यातून नेमके कुणाला रिझर्व्हेशन द्यायचे, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक प्रवाशांनी व्हीआयपी कोट्यातून अर्ज करूनही पुरेसा कोटा नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळाला नाही. तर काही प्रवाशांना बर्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा झाला. अजून दोन दिवस व्हीआयपी कोट्यासाठी अशाच मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.