शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाबाबत अद्यापही संभ्रम

By admin | Updated: June 12, 2017 01:27 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याबाबत प्रशासनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याबाबत प्रशासनाच्या निवांतपणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. असंतुष्टांची वर्णी लावण्यासाठी चांगले व्यासपीठ असल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा या विलीनीकरणाला विरोध असून, त्यातून येणाऱ्या दबावामुळेच प्रशासन काही कार्यवाही करीत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका शिक्षण मंडळात नगरसेवकांचा समावेश असला, तरी अन्य सदस्यांमध्ये राजकीय असंतुष्टांना स्थान देता येते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे. १६२ लोकनियुक्त व ५ स्वीकृत अशा १६७ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे १०१ सदस्य आहेत. महापालिकेतील सत्तापदे मर्यादित, समित्यांची संख्याही मर्यादित व सदस्यसंख्या मात्र मोठी; त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेकांना सत्तेत सामावून घेता आलेले नाही. त्याशिवाय निवडणुकीत उमेदवारी मागे घ्यायला लावलेले, त्यासाठी काही शब्द दिलेले, पक्षासाठी बरेच श्रम घेतलेले अशांचीही संख्या फार मोठी आहे. त्यांच्याकडून सत्तेत स्थान देण्याबाबत दबाव आहे.यामुळेच शिक्षण मंडळांचे विलीनीकरण न करता त्याचे अस्तित्व कायम ठेवावे, असा एक मतप्रवाह महापालिकेतील सत्ताधारी भाजपात आहे. राज्य सरकारकडून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी, असे त्यांचे मत आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. मंडळ राहिले तर त्यावर काही जणांना नक्की स्थान देता येणार असल्यामुळे पक्षश्रेष्ठीही त्याला अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच प्रशासनाने मंडळाच्या विलीनीकरणाबाबत थंडे धोरण स्वीकारले आहे. खुद्द मंडळातील प्रशासनालाही विलीनीकरण नको आहे. तसे झाले तर त्यांच्या स्वतंत्र कामकाज करण्यावरच मर्यादा येईल.शिक्षण मंडळातील गैरव्यवहार, भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळाचे कामकाज हा कायम चर्चेतील विषय राहिला आहे. शिक्षण मंडळाच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुणे महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी नव्या सभागृहाला मार्च २०१७मध्ये मंडळाची मुदत संपली असून, आता नव्या रचनेचा प्रस्ताव सभागृहासमोर दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, तशी काहीच हालचाल अद्याप तरी दिसत नाही.