शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुलावरच एसटीचा बसथांबा!

By admin | Updated: November 15, 2015 00:40 IST

पेठ गावातील बसस्टॉपवर अनेक खाजगी वाहने आडवी-तिडवी असतात. दुचाकी वाहनेसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडचण ठरत असल्याचे कारण चालक सांगून प्रवाशांना

पेठ : पेठ गावातील बसस्टॉपवर अनेक खाजगी वाहने आडवी-तिडवी असतात. दुचाकी वाहनेसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडचण ठरत असल्याचे कारण चालक सांगून प्रवाशांना बाह्यवळणावर वेळ नदीला पुलावर एसटी बस थांबवून प्रवाशांना तेथेच उतरवितात. सातगाव पठार भागातील पेठ हा एकच बसस्टॉप आहे. वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, कॉलेजला जाणाऱ्या व पेठ येथे कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मानसिक त्रास होतो. खात्याच्या अधिकाऱ्यांनी बाहेरून जाणाऱ्या एसटीबसचे सर्वेक्षण करावे व पेठ गावातून येणाच्या सूचना चालकांना द्याव्यात, अशी मागणी संतोष धुमाळ, सचिन पानसरे यांनी केली आहे. पेठ येथील एन. डी. पवळे कनिष्ठ महाविद्यालयात राजगुरुनगर व मंचर परिसरातील मुलेमुली शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना लोकल एसटी बसेस बाह्यवळण रस्त्यावर वेळ नदीच्या पुलावर सोडतात.एसटी बस पेठ गावातून न जाता बाह्यवळण मार्गाने परस्पर जात आहेत. त्यामुळे सातगाव पठार भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून परिवहन खात्याने बाहेरून जाणाऱ्या एसटी बस गाड्यांना गावातून जाण्याच्या सूचना देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी पेठचे उपसरपंच संतोष धुमाळ यांनी केली आहे.सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पारगाव तर्फे खेड येथील प्रवाशी पेठ येथील एसटी स्थानकावर राजगुरुनगर,मंचर आदी ठिकाणी जाण्यासाठी गर्दी करतात. सध्या दिवाळी सण चालू असल्याने शेकडो प्रवासी पेठ येथे स्थानकावर तासन् तास उभे राहतात. पुण्याहून मंचरकडे व मंचरहून पुण्याला जाणाऱ्या साध्या व लोकल प्रवासी बस पुणे-नाशिक महामार्गाहून पेठ बायपासने परस्पर निघून जातात. स्टॉपवर थांबणे एसटी गाड्यांना बंधनकारक केले असताना जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून पुणे, राजगुरुनगरकडे जाणाऱ्या काही एसटी बस पेठ गावातून येत नाहीत.