शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फी’ आदेशाचा राज्यभरातून निषेध

By admin | Updated: January 10, 2017 03:53 IST

शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या शासन निर्णयावर सडकून टीका

पुणे : शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या शासन निर्णयावर सडकून टीका झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, शासनाच्या ‘सेल्फी’ निर्णयाचा राज्यभरातील शिक्षक संघटनांनी सोमवारी निषेध नोंदवला. तसेच एकाही शिक्षकाने या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.राज्याच्या शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांची संख्या कमी करण्यासाठी उपाय म्हणून शिक्षकांना शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेल्फी काढण्याची जबाबदारी दिली. मात्र, सेल्फी काढण्याच्या कल्पनेचा शिक्षक व शिक्षकेतर संघटनांकडूनही निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारपासून सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करणे अपेक्षित होते. परंतु, सेल्फी काढणे हे अशैक्षणिक काम असून, त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जाणार आहे. शिक्षण विभागाने ‘सरल’मध्ये विविध प्रकारची माहिती भरून देण्याचे काम शिक्षकांवर सोपवले आहे. त्यात शिक्षण विभागाने सेल्फी काढण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केला. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना याबाबतचे निवेदन पाठविले आहे.शालाबाह्य मुलांचा शोधासाठी सेल्फी घेण्याची कल्पना अध्यादेशाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना बंधनकारक केली. मात्र, काही शिक्षकांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी तत्काळ स्मार्ट फोन घ्यावेत; अन्यथा संबंधितांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच शिक्षण अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.  याबाबतचे आॅडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)