शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्रनिश्चितीसाठी पालिका घेणार राज्याचा अभिप्राय

By admin | Updated: November 2, 2015 01:10 IST

नगरसेवकांनी शहरामध्ये क्षेत्रसभा घ्याव्यात याकरिता प्रत्येक प्रभागात क्षेत्रनिश्चिती करून ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

पुणे : नगरसेवकांनी शहरामध्ये क्षेत्रसभा घ्याव्यात याकरिता प्रत्येक प्रभागात क्षेत्रनिश्चिती करून ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. मात्र, ही क्षेत्रनिश्चिती नेमकी कशी करायची याबाबत संदिग्धता असल्याने महापालिकेकडून शासनाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय घेतला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. यामुळे क्षेत्रसभेचा तिढा लवकरच सुटून त्यांना नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियिम कायदा १९४९ मध्ये २००९ मध्ये दुरुस्ती करून कलम २९ क अन्वये प्रत्येक नगरसेवकाने दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक केले आहे. रस्ते, पाणी, साफसफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोईसुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा जाणून घेणे व त्याची सोडवणूक करणे ही तरतूद केली. या क्षेत्रसभा न घेतल्यास संबंधित नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्यानुसार क्षेत्रसभाच होत नसल्याची तक्रार स्वयंसेवी संस्थांकडून आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर क्षेत्रसभा होत नसल्याने अ‍ॅड. विकास शिंदे यांनी पालिकेला नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नगरसेवकांना १४ सप्टेंबर २०१५ रोजी एक पत्र पाठवून तातडीने क्षेत्रसभा घेण्याचे आदेश दिले. मात्र, क्षेत्रच निश्चित नसल्याने वॉर्डसभा कशा घ्यायचा, असा प्रश्न नगरसेवकांसमोर उभा ठाकला होता. त्यांनी लवकरात लवकर क्षेत्रनिश्चित करून मिळावे, अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे. आयुक्तांनी क्षेत्र निश्चित करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे काम निवडणूक विभागाकडे सोपविले आहे. याबाबत सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘कायद्यामध्ये क्षेत्रनिश्चित करून गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावयाचे आहे, गॅझेट हे राज्य शासन प्रसिद्ध करीत असते. त्यामुळे महापालिकेने क्षेत्र निश्चित करून ते राज्य शासनाकडून गॅझेटमध्ये प्रसिद्ध करायचे की राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेऊन क्षेत्र जाहीर करणार, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे शासनाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय घेतला जाणार आहे.’’