शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर, नीरा देवघर धरणभागात टॅँकर सुरू करा

By admin | Updated: March 28, 2017 02:08 IST

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात

भोर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने व भाटघर धरणातून २००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात मागील वर्षी भाटघर व नीरादेवघर दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र अडीच महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने भाटघर धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे. नीरादेवघर धरणातही २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. (वार्ताहर)पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरूनीरा देवघर धरण भागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा, चौधरीवस्ती, मानटवस्ती व महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, कारुंगण यांसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटार बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनेकदा गाळमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटारमुळे वीज बिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे त्याला वायर व मजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ््यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नाही.- ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी