शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रतील विसजर्न घाटांच्या दुरुस्तीला सुरुवात

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

वैभवशाली परंपरा असलेला गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेकडून गणोशोत्सवापूर्वी विसजर्न घाटांच्या स्वच्छतेचे तसेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

पुणो : वैभवशाली परंपरा असलेला  गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेकडून गणोशोत्सवापूर्वी विसजर्न घाटांच्या स्वच्छतेचे तसेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात असे सुमारे प्रमुख 16 विसजर्न घाट असून, येत्या आठवडय़ात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
गणोशोत्सव 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे. शहरात अर्धा दिवस, दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस 
तसेच सात दिवस आणि 11 दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विसजर्न घाटांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. 
मुठा नदीच्या काठावरील प्रमुख 16 विसजर्न घाट आहेत. हे घाट वारजे, कर्वेनगर, घोले रस्ता, कसबा-विश्रमाबाग वाडा, येरवडा, ढोले पाटील रस्ता, तसेच वडगावाशेरी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 
येतात. या घाटांवर गणोशमूर्ती विसजर्नासाठी विसजर्न हौद उभारण्यात आलेले आहेत. 
गणोशोत्सवानंतर पालिकेकडून हे हौद मातीने भरून ठेवले जातात. त्या हौदाच्या स्वच्छतेचे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी 
हौदांच्या रंगरंगोटीचे कामही सुरू करण्यात आले आहे. 
हे काम या आठवडय़ात पूर्ण करून हौद विसजर्नासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.  (प्रतिनिधी)
 
विसजर्न टाक्याही तयार 
4विसजर्न हौदांबरोबरच महापालिकेकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ठिकठिकाणी विसजर्नासाठी लोखंडी पाण्याच्या  टाक्यांचीही सुमारे 75 हून अधिक ठिकाणी  सोय करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, या सर्व ठिकाणी या टाक्या प्रशासनाकडून पोहचविण्यात आल्या आहेत. या टाक्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संदेशही देण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी येणा:या भाविकांना गणोशमूर्तीची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबल आणि मांडवाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.