शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मंचरचा साखळीचोर पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: May 20, 2014 23:28 IST

परिसरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. वृद्ध महिलांची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणार्‍या भामट्यास मंचर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे.

मंचर : परिसरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. वृद्ध महिलांची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणार्‍या भामट्यास मंचर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे. त्यामुळे वृद्ध महिलेचे ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याच्या तडाख्यातून वाचले आहेत. यापूर्वी मंचर परिसरात झालेल्या चार लुटमारीचे प्रकार उघडकीस आले असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिली. सुनील हरिश्चंद्र घोडेकर (वय ४७, रा. रूपी हाऊसिंग सोसायटी,रूपीनगर, हवेली मूळ गाव नांदुरकी फाटा, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी मंचरच्या पिंपळगाव चौकातून सुशीला विष्णू वायाळ (वय ६०, रा. गुळाणी, ता. खेड) पायी जात होत्या. त्या वेळी तुमचे लाईट बिल थकले आहे. मी वायरमन आहे. वीजबील भरा नाही तर वीजपुरवठा तोडू, त्यासाठी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र द्या, असे सांगून चोरटा सुशिला यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेत असताना गस्तीवर असलेले सहायक फौजदार आय. ए. सय्यद तेथे आले. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. जुन्नर न्यायालयाने आरोपीला गुरुवार (दि. २२) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस तपासात ते निष्पन्न झाले आहे. या आरोपीकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)