शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब

By admin | Updated: February 23, 2017 03:24 IST

चित्रपटांमुळे मुले बिघडतात. नको त्या वयात मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतात, असे म्हणत मुलांना

पुणे : चित्रपटांमुळे मुले बिघडतात. नको त्या वयात मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतात, असे म्हणत मुलांना चित्रपट आस्वादापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याबरोबरच मुलांमध्ये चित्रसाक्षरता ही संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि आरभाट फिल्म्स या दोन संस्थांनी मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब सुरू करण्याच्या दिशेने अभिनव पाऊल टाकले आहे. दर महिन्याच्या शनिवारी किंवा रविवारी चित्रपट स्क्रिनिंगद्वारे चित्रपटसृष्टीच्या वारशाचा मुलांना परिचय करून देणे, हे या नव्या चित्रपट क्लबचे उद्दिष्ट आहे. चित्रपटावर मुलांशी चर्चा घडविण्यावर भर दिला जाईल. हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी खुला राहील. दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान एनएफएआय कोथरूड येथे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते सत्यजित रे यांच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘सोनार केल्ला’ या पहिल्या स्क्रिनिंगने क्लबचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम आणि आरभाटचे उमेश कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.कुलकर्णी म्हणाले, ‘‘चित्रपटाचे अचूक प्रेक्षक कुणी असतील तर ती मुले. पडद्यावर पाहत असलेल्या चित्रकृतीबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात, जगात जे घडत आहे, त्याबद्दल त्यांच्या संवेदनशील जाणिवा जागृत असतात. मुलांमध्ये चित्रपटविषयक जागरूकता रुजविण्यासाठी हा चित्रपट क्लब निर्मित करण्यात आला असून, एक पोषक चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराला त्याची नक्कीच मदत होईल. या चांगल्या उपक्रमांना मुलांना सोडण्या-आणण्याचा प्रश्न पालकांना नक्कीच भेडसावतो; पण पालकांनीच मुलांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.’’मगदूम म्हणाले, ‘‘या उपक्रमाला मुलांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी शहरातील सर्व शाळांशी आम्ही संपर्क साधला आहे. यासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात येणार आहे.’’