शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास ठरावासाठी होणार खास सभा

By admin | Updated: July 25, 2015 04:21 IST

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याविरोधात भाजपकडून अविश्वास

पुणे : आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाणार आहे. या ठरावावरील निर्णय घेण्यासाठी खास सभेचे आयोजन करावे, असे पत्र मंडळातील भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी अध्यक्षांना दिले आहे. दरम्यान, हा अविश्वास ठराव ठेवण्यापूर्वी भाजपच्या सदस्यांनी धुमाळ यांना नोटीस पाठविली होती. या नोटिशीला धुमाळ यांनी उत्तर दिले असून, ते समाधानकरक नसल्याने ही सभा बोलावण्याची मागणी भाजपच्या मंडळातील सदस्यांनी केली आहे. भाजपचे सदस्य रघुनाथ गौडा, मंजुश्री खर्डेकर, किरण कांबळे यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. मागील महिन्यात या बदली प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला एका मध्यस्थ व्यक्तीला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या प्रकरणी धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवी चौधरी यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता, तसेच या दोघांना अटकही झालेली होती. त्यामुळे भाजप सदस्यांनी ४ जुलै रोजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांना नोटीस पाठविली होती. धुमाळ यांनी विहित कालावधीमध्ये या नोटिशीला उत्तरही दिले आहे. परंतु, धुमाळ यांनी केलेला खुलासा मान्य नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी खास सभेचे आयोजन करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे.