शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

खामुंडीच्या धर्मनाथ दर्शनाला भाविकांची तुरळक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST

आळेफाटा : खामुंडी येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या धर्मनाथ ...

आळेफाटा : खामुंडी येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या धर्मनाथ देवस्थान यात्रेनिमित्त यंदा भाविकांची तुरळक गर्दी निदर्शनास आली. बैलगाडा शर्यतीच्या घाटातही पूर्णपणे शुकशुकाट होता.

दरवर्षी यात्रेला जुन्नर, खेड, आंबेगाव, पारनेर, अकोले, मुरबाड आदी तालुक्यांतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, परंतु वर्षानुवर्ष चालत आलेली बैलगाडा शर्यतींची परंपरा या वर्षी कायद्याने बंद असल्यामुळे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटातही पूर्णपणे शुकशुकाट होता. बैलगाडा शर्यतबंदीचा मोठा आर्थिक फटका वडापाव, भेळ, आइस्क्रीम, रसवंतीगृह, पाणी व खेळणी विक्रेते या छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. बैलगाडा शर्यतबंदीमुळे जनसामन्यांमध्ये तीव्र स्वरूपाच्या संतापी प्रतिक्रिया उमटत होत्या. काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष मारुती बाबूराव शिंगोटे आणि सचिव संदीप पांडुरंग गंभीर यांनी माहीिती दिली की, सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बैलगाडा शर्यतबंदीमुळे या वर्षी निराशा होऊन यात्रेत मोठा शुकशुकाट पहायला मिळाला. देवदर्शनाच्या निमित्ताने जमलेल्या भाविकांमध्ये यावेळी एकच चर्चा दिसून आली. ती म्हणजे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार कधी? आणि यात्रेचा पुन्हा आनंद कधी? घेता येणार? खामुंड़ी गावचे नवनिर्वाचित सरपंच वनराज शिंगोटे, उपसरपंच विश्रांती बोडके यांचे हस्ते धर्मनाथाची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला, त्यानंतर दिवसभर सहकुटुंब सहपरिवार बैलगाडीत बसण्याचा आनंद घेत भाविक धर्मनाथ दर्शनासाठी येत होते. जनसेवा ग्रुपच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य दशरथ जगताप, सत्यवान डुंबरे, दीपाली सासवडे, मंगल जगताप, सागर कोकाटे, सुरेखा भोर, कल्पना कोकाटे, उद्योजक सुभाष बोडके, अनिल बोडके, डॉ. माया गंभीर, अक्षय शिंगोटे, कैलास बोडके, संतोष शिंगोटे, जितेंद्र रोकडे, कौतुभ गंभीर, नवनाथ शिंगोटे, पांडुरंग बोडके, शहाजी जाधव, दिलीप बोडके आदी उपस्थित होते.

खामुंडी येथे बैलगाडा शर्यतबंदीमुळे घाटात शुकशुकाट.