शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्य दलात लवकरच भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

बारामती : ‘कोरोना’ मंदीत बेरोजगारांसाठी रोजगाराची मोठी बातमी हाती आली आहे. भारतीय सैन्य दलात लवकरच ...

बारामती : ‘कोरोना’ मंदीत बेरोजगारांसाठी रोजगाराची मोठी बातमी हाती आली आहे. भारतीय सैन्य दलात लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सैन्य दलातील आर्मीमध्ये पुणे आर्मी रिक्रुटिंग ऑफिस अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इ. ८ वी, १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून पुणे आर्मी रिक्रुमेंट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या ६ जिल्ह्यांसाठी असणार आहे. ही भरती प्रक्रिया ७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी असणार आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक असून ते ९ जुलै ते २२ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. अ‍ॅडमिट कार्ड २४ ऑगस्टनंतर उपलब्ध होणार आहे. या भरतीमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्यूटी, ट्रेड्समॅन या पदांसाठी अर्ज करता येईल. तर ८ वी उत्तीर्ण उमेदवारांना ‘ट्रेड्समॅन’मधील मेस किपर, हाऊस किपर यांसारख्या पदांकरिता अर्ज करता येईल. याशिवाय १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट आदी पदांसाठी अर्ज करता येईल.

या भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक मोजमापे घेतली जातील व त्यानंतर १०० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १६०० मीटर धावणे व पुलप्स हे दोन प्रकार असणार आहेत. याशिवाय ९ फुट रुंद खड्डा पार करणे व निमुळत्या झिगझॅक फळीवरून तोल संभाळत चालणे या प्रकारांचा समावेश असणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या वैद्यकीय चाचणीत दृष्टिदोष, शारीरिक व्यंग इत्यादी तपासण्या केल्या जातील. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

याबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामतीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, भारतीय सैन्य दलांमध्ये पुणे आर्मी रिक्रुटिंग ऑफिस अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला आहे. या भरतीतील पात्रता, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, बोनस गुण व इतर बाराकावे जाणून घेतल्यास यामध्ये मुलांना सहज भरती होता येईल.