शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’ची आर्थिक दिवाळखोरी गाजणार

By admin | Updated: September 12, 2014 03:26 IST

बारामती, पुरंदर, खंडाळा या तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला

सोमेश्वरनगर : बारामती, पुरंदर, खंडाळा या तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज (दि. १२ सप्टेंबर) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुद्दा चांगलाच गाजणार आहे. ऊस उत्पादकांनी, सर्व विषयांवर संचालक मंडळांनी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. गैरव्यवहाराशी संबंधित दोषी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठराव करणे आणि योग्य विषय मंजूर तर अयोग्य विषय नामंजूर करणे असे अधिकार उद्या सभासदांना वापरावे लागणार आहेत. तरच १७ हजार सभासदांचा प्रपंच वाचणार आहे. सोमेश्वर कारखान्यात जो काही गैरव्यहार झाला आहे, तो संचालक मंडळ, अधिकारी बरोबर अनेक बडे मासेही असल्याचे सभासदांच्यात बोलले जात आहे. कारखान्याला अडचणीत आणलेल्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका सभासदांची आहे. राज्यात अग्रेसर म्हणून ओळख असलेल्या कारखान्याची आर्थिक दिवाळखोरी झाली असल्याचे लक्षात आल्यावर सभासदांच्यात संतप्त भावना निर्माण झाल्या. ज्यांच्यावर विश्वास ठेवून १७ हजार सभासदांचा प्रपंच हातात दिला, त्यांनीच आज कारखान्याची ही दुर्दशा केल्यामुळे सभासद नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत कारखान्यावर झालेला कर्जाचा डोंगर व ५२ कोटी रुपयांच्या अपहाराबद्दल हात झटकले असून, याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले. एकीकडे कारखान्याचे विरोधक व शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढत संचालक मंडळाला बेड्या ठोकल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर कारखान्याचे ज्येष्ठ सभासद सर्जेराव काकडे यांनी कारखान्यातील ५२ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.कारखाना वाचवायचा असेल तर सर्व सभासदांना पक्ष सोडून एक होण्याशिवाय पर्याय नाही, तरच या कर्जाच्या बोजातून सोमेश्वर वाचू शकतो. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. (वार्ताहर)