शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी चळवळ मागे पडली

By admin | Updated: June 6, 2016 00:22 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. मात्र आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. समाजवादी विचारांचा प्रभाव ओसरत चालला आहे. अनेक प्रश्नांवर काम करण्यात चळवळ मागे पडली असल्याची खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देशापुढील आव्हाने आणि राष्ट्र सेवा दलाची अपरिहार्यता’ या विषयावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅड. सुरेखा दळवी, कॉम्रेड संजय दाभाडे, आमदार कपिल पाटील, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. डॉ. अभिजीत वैद्य अध्यक्षस्थानी होते.अ‍ॅड. दळवी म्हणाल्या, ‘अहिंसा, सत्यामध्ये ताकद आहे. पण, समाजवादी विचारांचा प्रभाव पडत नाही. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांपर्यंत आजही आपण पोहचू शकलो नाही. याचे विवेचन करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीने निर्माण झालेल्या धोरणांचे आव्हान आजही आपल्यासमोर आहे. सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले हातपाय पसरत आहे. जातीचे राजकारण वाढत आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतरची अस्वस्थता आजही दिसून येत आहे. देशात विषमता, द्वेष भावना शिल्लक आहे तोपर्यंत राष्ट्र सेवा दलाची गरज आहे.’’दाभाडे म्हणाले, भांडवलशाहीचे मोठे आव्हान आहे. फॅसिझम आकाराला येऊ लागले आहे. विचार आणि संघटन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. समाजवादी दिशेने आगेकूच करण्याची जबाबदारी सेवा दलाने घेतली आहे. आर्थिक धोरणांमुळे जी परिस्थिती आलीय त्याला कसे सामोरे जाणार आहोत. आव्हानांचा सामना करत सेवा दल निभावून पुढे जाईल.पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कमजोर वीणेवर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना केलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. (प्रतिनिधी)