शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया ग्रुप निकालानंतर गायब

By admin | Updated: May 20, 2014 04:48 IST

निवडणुकीचे वातावरण सुरू होताच, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार झाले. मोबाईलवरील एसएमएसपासून ते इंटरनेटवरील फेसबुक आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या समर्थकांकडून संदेशाचा मारा सुरू होता

पिंपरी : निवडणुकीचे वातावरण सुरू होताच, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार झाले. मोबाईलवरील एसएमएसपासून ते इंटरनेटवरील फेसबुक आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या समर्थकांकडून संदेशाचा मारा सुरू होता, तो मतमोजणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत... निकालाचे चित्र स्पष्ट होताच, ग्रुप संपुष्टात आले. विजयी आणि पराभूत उमेदवारांबद्दलच्या भावना व्यक्त करणारे मोजके संदेश आता मोबाईलवर पहायला मिळत आहेत. पक्षांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आपणच अशा अविर्भावात भावी खासदार असे शब्दांकन केलेले संदेश इंटरनेटच्या संकेतस्थळावर तसेच फेसबुकच्या पेजवर पोस्ट केले जात होते. समर्थकांकडून त्यास मोठ्या प्रमाणावर लाईकसुद्धा केले जात होते. उमेदवारी जाहीर होण्यापासून ते प्रचार, मतदान आणि मतमोजणी या प्रत्येक टप्प्यावर सोशल मीडियावरील ग्रुप अधिक ‘अ‍ॅक्टिव’ झाले होते. उमेदवारासाठी आपण किती प्रभावीपणे काम करत आहोत, हे दाखविण्यासाठी काही कार्यकर्ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपचे मॅनेजमेंट करण्यात गर्क होते. सोशल मीडियावर एक प्रकारे प्रचारयुद्धच सुरू होते. मेळावे, कोपरा सभा, बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटी याची छायाचित्रासह माहिती अत्यंत जलदगतीने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आदळत होती. आपले उमेदवार कसे सरस हे दाखवून देण्याचा त्यातून प्रयत्न होत होता. ज्या पक्षाचे उमेदवार त्या पक्षाचे धोरण काय आहे. त्याच्या व्हिडीओ क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवल्या जात होत्या. ते धोरण लोकहिताच्या दृष्टीने उपयुक्त कसे हे सांगण्याचा प्रयत्न होत असताना, प्रतिस्पर्धी पक्षावर, नेत्यांवर टीका, टिप्पणीसुद्धा केली जात होती. (प्रतिनिधी)