शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

गणवेश खरेदीत संशयाचा धूर

By admin | Updated: April 24, 2015 03:42 IST

: महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या गणवेशखरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून संशयाचा धूर येत आहे.

पुणे : महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या गणवेशखरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून संशयाचा धूर येत आहे. या गणवेशखरेदीत प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीपेक्षा त्याच कंपनीची एजन्सी असलेल्या कापड विक्रेत्याने कमी दराची निविदा सादर केली आहे. तर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनीने पुन्हा महापालिकेस पत्र पाठवून एजन्सीच्या दरानेच कापड देण्यास सहमती दर्शविली असून, त्यानुसार, प्रशासनाने कंपनीकडून खरेदी करण्याची शिफारस केली असून, त्याबाबतच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव ठेवताना, ज्या ठेकेदारांनी निविदा भरल्या, त्यांनी महापालिकेस दिलेल्या दरांची कोणतीही माहिती या प्रस्तावात नमूद करण्यात आलेली नाही. तब्बल ५८ लाख रुपयांची ही कापड खरेदी आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या ११ हजार विद्यार्थ्यांसाठी पालिकेकडून दरवर्षी गणवेश पुरविले जातात. हे गणवेश वेळेत मिळावेत यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यात चार पुरवठादारांनी सहभाग घेतला होता. त्यातील महापालिकेकडून ज्या कंपनीचे कापड खरेदी करण्यात येणार आहे, त्या मफतलाल या कंपनीनेही निविदा सादर केली होती. मात्र, या निविदांवरून कोणत्या कंपनीने जादा दराने निविदा भरली हे स्पष्ट होत नव्हते. विशेष म्हणजे या पुरवठादाराकडे मफतलाल कंपनीच्या कापडाची एजन्सी आहे. त्यामुळे एजन्सीपेक्षा कंपनीने जादा दराने निविदा भरल्याचे स्पष्ट होते.