शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ बैठक आटोपती

By admin | Updated: May 13, 2017 04:53 IST

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अ‍ॅडॉप्टिंग ट्रॅफिक सिग्नलवर

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अ‍ॅडॉप्टिंग ट्रॅफिक सिग्नलवर चर्चा झाली. अध्यक्ष नसल्यामुळे थोडक्यात माहिती घेऊन पुढील बैठक १० ते १७ जूनच्या दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष असलेले नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर परगावी गेले होते. त्यामुळे पदसिद्ध संचालक असलेल्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सिग्नलची माहिती घेतली.या नव्या पद्धतीच्या सिग्नलमध्ये एका एलईडी स्क्रिनवर पुढील चौकात वाहतुकीची काय स्थिती आहे, ते वाहनचालकांना दिसणार आहे. तो चौक वाहतुकीस मोकळा झाल्यानंतरच अलीकडच्या वाहनचालकांना सिग्नल मिळेल, अशी रचना त्यात आहे. या कामाच्या निविदेबाबतही बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजतेदरम्यान, राज्य सरकारने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. अमित सैनी या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची त्यांनी कार्यभार घेण्याआधीच बदली करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात येण्याआधीच दुसरीकडे पाठवण्यात आले आहे. त्यांना मुंबई येथे विक्रीकर खात्याचे सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या कंपनीतील या महत्त्वाच्या पदाचा कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे आहे, मात्र त्या गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर असल्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेच या पदाचे अतिरिक्त काम पहात आहेत.