शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

सुस्त पोलीस, बेफिकीर नागरिक

By admin | Updated: July 3, 2015 02:42 IST

कोणी तरी माथेफिरू, गुंड टोळ्यांचे टवाळ उठतात सर्वसामान्य नागरिकांनी पै-पै जमा करून विकत घेतलेली वाहने फोडतात, जाळतात. दहशत माजवून कष्टकरी, मध्यमवर्गीयांचे जिणे हैराण

पुणे : कोणी तरी माथेफिरू, गुंड टोळ्यांचे टवाळ उठतात सर्वसामान्य नागरिकांनी पै-पै जमा करून विकत घेतलेली वाहने फोडतात, जाळतात. दहशत माजवून कष्टकरी, मध्यमवर्गीयांचे जिणे हैराण करून सोडणाऱ्या या प्रवृत्तीला ठेचण्यात आणि पायाबंद घालण्यात पोलीस मात्र अपयशी ठरतात. ही प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची आवश्यकता असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी रात्री केलेल्या पाहणीमधून स्पष्ट झाले. त्याचबरोबर, नागरिकही बेफिकीर राहतात, आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत नाहीत, असेही दिसून आले. ५० ते ६० लाखांची लोकसंख्या असलेल्या पुण्यात पोलीस सर्वच ठिकाणी पुरे पडू शकत नाहीत, हे ओळखून पुणेकरांनी आपल्या सुरक्षेसाठी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज असल्याचेच यातून स्पष्ट झाले. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर एका माथेफिरू तरुणाने तब्बल ९० वाहनांची जाळपोळ केल्याची घटना ताजी आहे. हा माथेफिरू अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. तसेच, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेला जबाबदार धरून पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाईही केलेली नाही. परंतु, एवढी मोठी घटना घडूनही नागरिकांनी मात्र कोणताच धडा घेतलेला नाही. पोलीस आणि नागरिक सुरक्षेबाबत नेमके किती जागरूक आहेत, याची पाहणी बुधवारी मध्यरात्री केली. सुस्तावलेले पोलीस आणि निद्रिस्त नागरिक, अशीच परिस्थिती दिसून आली. बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, कोथरूड, सिंहगड रस्त्यावर बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी पहाटे चारपर्यंत ‘लोकमत’चे प्रतिनिधी खासगी वाहनामधून फिरले. अनेक सोसायट्यांना गेटच नव्हते. कोणत्याही सोसायटीमध्ये कोणीही केव्हाही येऊ जाऊ शकत होता. काही सोसायट्यांना गेट आहे; परंतु ते गेट बंद करण्याची तसदीही नागरिक घेत नसल्याचे निदर्शनास आले. ज्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले आहेत; ते झोपलेले आढळले. तर, जे जागे होते त्यांना शेजारच्या सोसायटीमध्ये काय चालले आहे, तेथे कोण येत-जात आहे, याच्याशी काही कर्तव्य नव्हते. स्टिंग आॅपरेशन करायला निघालेले प्रतिनिधी रात्री या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये जाऊन आले. मात्र, बहुतांशी सोसायट्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरेच बसवलेले नसल्याचे निदर्शनास आले. उपनगरात मोडत असलेल्या या भागात रात्री काही ठिकाणी तरुण बसलेले आढळले; परंतु त्यांनीही संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या वाहनाला साधे हटकलेही नाही. बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका ठिकाणी दीडच्या सुमारास काही तरुण बसलेले होते. त्यांच्यासमोरच वाहनामधून उतरून सोसायटीमध्ये जाऊन एक प्रतिनिधी परत बाहेर आला. परंतु, या तरुणांनी त्याच्याकडे साधी चौकशीही केली नाही. रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण लक्षणीय होते. रस्त्याने जाणाऱ्या कोणालाही वाहनाचे नुकसान करणे अगदी सोपे होते. लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा नागरिकांची वाहनांच्या सुरक्षेबाबतची उदासीनता दर्शवीत होती. पोलिसांची गस्त दिसली; परंतु तुरळकया संपूर्ण पाहणीदरम्यान केवळ लॉ कॉलेज रस्ता आणि कोथरूडमध्ये पोलिसांच्या व्हॅन रस्त्यावरून जाताना दिसल्या. तर, सिंहगड रस्त्यावर जळीतकांड घडलेले असल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालताना दिसले. यांतील काही अधिकाऱ्यांशी लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यांनी नागरिक पुरेसे जागरूक नसल्याचे निरीक्षण नोंदविले.दुचाकी शोरूमची वाहने रस्त्यावरचबाणेर भागात एका दुचाकी शोरूमची नवीकोरी वाहने रस्त्यावर रांगेने लावण्यात आलेली होती. नोंदणी न झालेल्या या वाहनांवर नंबरप्लेटही नव्हत्या. त्यामुळे चोरट्यांना त्या चोरून नेणे अथवा तोडफोड करणे सोपे होते. इथे सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेला नव्हता. सुरक्षेबाबत असलेली कंपन्यांची आणि व्यापाऱ्यांची उदासीनता यामधून प्रकर्षाने जाणवत होती.डॉमिनोज् पिझ्झाने घेतला नाही धडासिंहगड रस्त्यावर झालेल्या जळीतकांडामध्ये डॉमिनोज् पिझ्झासमोर लावलेली वाहनेही जाळण्यात आली होती. या घटनेनंतरही डॉमिनोज् पिझ्झाच्या सिंहगड रोड आणि बाणेर येथील आऊटलेटसमोर पदपथावरच दुचाकी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक आहेत. मात्र, फलकाच्या समोरच दुचाकींच्या रांगा पदपथावर बिनधास्त लावण्यात आल्या होत्या. आम्हाला काही देणे-घेणे नाही लोकमच्या प्रतिनिधीचे वाहन विविध सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहत होते. बहुतांश सोसायट्यांमध्ये काही नागरिक जागे होते; परंतु आपल्या सोसायटीमध्ये रात्री उशिरा कोणते वाहन आले, आपल्या पार्किंगच्या आवारात अनोळखी व्यक्ती का फिरत आहे, असा कोणताही प्रश्न एकाही सोसायटीतील नागरिकाला पडल नाही. तसेच, कोणीही याबाबत लोकमतच्या प्रतिनिधींना हटकले नाही. त्यामुळे आम्हाला काहीही देणे-घेणे नाही, अशी प्रवृत्ती शहरातील नागरिकांमध्ये वाढत चालली असल्याचे दिसून आले.शहरातील मोठ्या आणि काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सोसायट्यांना भिंतीचे कुंपण आणि लोखंडी दरवाजा बसविण्यात आला आहे. परंतु, जुन्या सोसायट्यांना अद्याप भिंतीचे कुंपण बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे जुन्या सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. काही सोसायट्या तर रस्त्याच्या लगत आहेत. त्यामुळे सोसायटीतील नागरिक रस्त्यावरच चारचाकी व दुचाकी वाहने लावत असल्याचे दिसून आले. वाहनावर अगदी कव्हर टाकून त्याची काळजी घेतलेली; पण त्याच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न कोणालाही पडत नाही, हे विशेष. सुरक्षा भटक्या कुत्र्यांकडे ?बाणेर, पाषाण, कोथरूड आणि सिंहगड रस्ता परिसरातील तुरळक सोसायट्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, रात्री बारानंतर बहुतेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक निर्धास्तपणे झोपल्याचे आढळून आले. त्यामुळे सोसायट्यांची सुरक्षा या परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर सोपविण्यात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.सोसायटीच्या कम्पाउंडची दुरुस्ती आवश्यकशहरातील काही सोसायट्यांच्या भोवती लोखंडी कम्पाउंड उभारण्यात आले होते. परंतु, ते मोडकळीस आले आहे. त्यामुळे सोसायटीची हद्द समजू शकेल एवढाच उपयोग या कम्पाउंडचा होतो. त्यामुळे या जळीतकांडानंतर सोसायटीच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोडकळीस आलेल्या कम्पाउंडची दुरुस्ती करण्याचा विचार सोसायटीतील रहिवाशांना गांभीर्याने करावा लागणार आहे.सिंहगह रस्ता परिसरात जळीतकांड घडले. मात्र, येथील नागरिकांनी त्यापासून धडाच घेतला नाही, असे दिसून आले. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये अद्यापही सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. एवढेच काय, पण सोसायटीला गेट असतानाही ते लावण्याचीही दखल रहिवासी घेत नाहीत. किमान गेट बंद असले तरी त्यामुळे फरक पडू शकतो. मात्र, ही सगळी बेफिकिरी दिसून आली. मयूर कॉलनी हा पुण्यातील उच्चभ्रू परिसर. या ठिकाणी अनेक सोसायट्या कुलूपबंदही आढळून आल्या. मात्र, काही सोसायट्यांमध्ये गेटच नाही, वाहने अस्ताव्यस्त लावलेली, असे चित्र होते. सोसायटीच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठे वाहन फिरत असताना एकाही रहिवाशाला किमान हटकावे, असेही वाटले नाही. इमारतींमधील पार्किंग ‘फुल्ल’ झाल्यामुळे जवळपास सर्वच भागांमध्ये रस्त्यावर आणि पदपथावर वाहने लावण्यात आल्याचे दिसले. यामध्ये प्रामुख्याने मोटारींची संख्या सर्वाधिक होती. तर, या भागात ‘लोकमत’चे प्रतिनिधी फिरत असताना पोलीस मात्र अभावानेच दिसले. दाट लोकवस्ती, लांबच लांब पसरलेली पोलीस ठाण्यांची हद्द आणि अपुरे मनुष्यबळ यांमुळे कामावर मर्यादा येत असल्याच्या प्रतिक्रिया पोलिसांनी दिल्या. पोलीस रात्री गस्तवर असताना येऊन सुरक्षेची पाहणी करतात, असे सन आॅरबिट या सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले.-----------------------------------------------------------------टीम लोकमत : लक्ष्मण मोरे, राहुल कलाल, राहुल शिंदे.