शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गुळूंचवाडीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

By admin | Updated: March 31, 2017 23:48 IST

गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथे श्री मळगंगा देवी व कानिफनाथाच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते

बेल्हा: गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथे श्री मळगंगा देवी व कानिफनाथाच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते.या निमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कलगीवाले शाहीर जयसिंग माळवतकर आणि पार्टी व तुरेवाले शाहीर रामदास गुंड आणि पार्टी यांचा कलगी तुऱ्याचा सामना रंगला. तसेच त्यानंतर शाहीर ठकसेन शिंदे यांचा भेदिक गाण्यांचा कार्यक्रम झाला. या काळात युवा नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्य अनघा घोडके व सरपंच मंगल गोसावी यांनी भेटी दिल्या. त्यानंतर शेरणी वाटप व रात्री काठ्या पालखीची भव्य मिरवणूक झाली. त्यानंतर मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले. या आखाड्यात नामवंत मल्लांनी भाग घेतला होता. राज्यभरातून मल्लांनी या आखाड्यात सहभाग नोंदविण्यासाठी हजेरी लवली. या भागात हा सर्वांत मोठा आखाडा भरतो. या ठिकाणी अगदी ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. काही कुस्त्या निकाली झाल्या त्यांना ग्रामस्थांच्या वतीने रोख इनाम देण्यात आले. पंच म्हणून पांडुरंग गाडेकर, संतोष शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी विठ्ठल गुंजाळ, अतुल भांबेरे, भाऊसाहेब भांबेरे, काशिनाथ गुंजाळ, तुळशीराम गुंजाळ, दगडू काळे, अशोक गोसावी रंगनाथ भांबेरे, संतोष आग्रे, विजय गुंजाळ आदी उपस्थित होते.