शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या कुशीतून पळवून नेत सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

पुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच ...

पुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच घडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. सागर मारुती मांढरे (वय 39, रा. दुगड चाळ, सच्चाईमाता मंदिरा मागे, कात्रज) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे कुटुंब मालधक्का चौकाजवळील एका झोपडपट्टीत राहते. पीडित मुलगी आईवडिलांसोबत एसटी बस स्थानकासमोरील फुटपाथवर आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मांढरे याने जबरदस्तीने तिला उचलून रिक्षामध्ये नेले. रिक्षा सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड थिएटरच्या मागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी आपल्या सोबत नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली मात्र मुलगी सापडली नाही. त्यांनीतातडीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य ओळखले. आसपासचा परिसर पिंजून काढत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेब्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीची ऑटोरिक्षा एमएच 12, सीएच 0715 मधून आरोपी मांढरे मुलीला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसानी आरोपीचा शोध घेत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.

सहा वर्षांची मुलगी रात्रीतून हरवल्याची तक्रार प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे, असे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस

यशवंत गवारी यांनी सांगितले.