शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या सहा नराधमांना अटक

By admin | Updated: September 3, 2016 03:12 IST

जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या

पुणे : जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. या आरोपींकडून ठाण्यातील हिल लाईन भागातील दरोड्यासह आणखी एक तिहेरी खून उघडकीस आणण्यात एलसीबीला यश आले आहे. ही कारवाई पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली होती.ऋषी ऊर्फ ऋषन अशोक काळे (वय १९, रा. कासारवाडी रेल्वे स्टेशन, कासारवाडी), अनिल ऊर्फ तिऱ्या ढोम्या काळे (वय ३0, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मावळ. मूळ रा. मुखई जातेगाव, शिक्रापूर), मथ्या ऊर्फ नामदेव यमराज भोसले (वय १९, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. गणेगाव खालसा, शिरूर), नागेश ऊर्फ सचिन अशोक काळे (वय ३२, रा. रांजणगाव मशिदीजवळ), आकाश ऊर्फ डोळा कळसिंग भोसले (वय २0, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी. मु आणि गोविंद ऊर्फ नीलेश सुरेश भोसले (वय २0, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी साकोरीमधील शंकर भीमाजी पानसरे (वय ४५) यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला होता. कुऱ्हाडीने घाव घालून शंकर यांचा खून केल्यानंतर त्यांची पत्नी संगीता (वय ४0) यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचाही खून केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली होती. आरोपींनी २३ जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील करवले येथील शंकर भंडारी (वय ६0) यांच्या घरावर दरोडा टाकत भंडारी यांच्यासह त्यांची पत्नी फसुबाई (वय ५0) आणि त्यांचा मुलगा शनी (वय २0) यांचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला होता. (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दरोडा, दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराचा गंभीर गुन्हा ३ दिवसांत उघडकीस आणून ६ आरोपींना गजाआड केल्याने अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. डॉ. जाधव यांनी पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.