शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

दुपारी एकला सायबर कॅफे झाली हाऊसफुल्ल...

By admin | Updated: June 18, 2014 02:21 IST

दहावी आॅनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. याचबरोबर मोबाइलवर निकाल जाणून घेण्यात अनेकांनी पसंती दिली.

पिंपरी : दहावी आॅनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. याचबरोबर मोबाइलवर निकाल जाणून घेण्यात अनेकांनी पसंती दिली. गुुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे फलक शाळेत रंगविले गेले. निकाल स्पष्ट झाल्याने अकरावी प्रवेशाची उत्सुकता आता लागली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज दहावीचा निकाल आॅनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर निकाल घोषित करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला लागली होती. सायबर कॅफेत जाऊन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अपेक्षित गुण मिळाल्याने एकमेकांचे अभिनंदन करून जल्लोष करीत होते. कोणाला किती गुण मिळाले याची चर्चा त्यांच्यात रंगली. अनेकांनी मोबाइलवरच निकाल जाणून घेतला. गुणपत्रिकेची प्रत काढण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घेण्यात आला. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन सायबरचालकांनी नेहमीच्या दरात वाढ करून २० ते २५ रुपयेप्रमाणे प्रिंट काढून दिली. निकाल तपासण्यात शिक्षकांची कसरतआॅनलाइन निकाल असल्याने विद्यार्थ्यांची कामगिरी कशी आहे. हे तपासण्यात शिक्षकांना खूपच कसरत करावी लागली. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण तपासून त्यांची क्रमवारी करणे, ९० व ८० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची यादी करणे, तसेच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची नावे काढण्यासाठी कसरत करावी लागली. किचकट यादीतून नावे शोधताना शिक्षकांच्या नाकीनऊ आले होते. प्रथम तीन क्रमांकाचे तसेच, विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळेत बोलावून घेतले गेले. त्यांचे पुुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी विशेष गौरव केला. शाळेच्या फलकावर त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.(प्रतिनिधी)