शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शर्यतबंदी उठविण्याची चिन्हे!

By admin | Updated: June 15, 2014 04:05 IST

बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा

पुणे : बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा, या प्रमुख मागणीसाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडामालकांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जावडेकर यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्व मदत करणार असल्याचे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला.जावडेकर यांच्याशी चर्चा करताना खासदार आढळराव-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले, की १९९१मध्ये राजपत्रात कुत्रा या पाळीव प्राण्याचा समावेश केला होता. त्याविरोधात इंडियन सर्कल संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले. न्यायालयाने कुत्रा हा शब्द राजपत्रातून वगळावा, असा निर्णय दिला. बैल हादेखील पाळीव प्राणी असूनही जंगली प्राण्यांच्या यादीत समावेश करणे सर्वथा चुकीचे असल्याने बैल हा पाळीव प्राणी सदर राजपत्रातून वगळावा, अशी विनंती केली. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचार्णे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर, खासदार आढळराव-पाटील, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंगशेठ एरंडे, पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. अमृता गुरव, संदीप बोदगे, अण्णा भेगडे, भानुदास लांडगे, सागर शेलार, रामभाऊ सासवडे, मुकुंद बोऱ्हाडे, राजेंद्र टाकळकर, संतोष भोसले, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र दिंडोरे, संदेश आल्हाट, दत्ता गिलबिले, संदीप मोरे, अमोल हरपळे, करण जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)