शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल

By admin | Updated: November 9, 2015 01:48 IST

दिवाळी साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरातील बाजार रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी नागरिकांनी फुलून गेला होता.

पिंपरी : दिवाळी साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरातील बाजार रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी नागरिकांनी फुलून गेला होता. दिवसभर येथील रस्ते फुलून गेले होते. रहदारी संथ होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे आर्थिक तज्ज्ञांनी सांगितले. धनत्रयोदशी व यम दीपदान सोमवारी आहे. पिंपरी, चिंचवड या मुख्य बाजारपेठेसह भोसरी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, इंद्रायणीनगर, शाहूनगर आदीसह उपनगरातील बाजारात दिवसभर गर्दी होती. त्याचबरोबर शेजारच्या खडकी, देहूरोड बाजारपेठ आणि मावळ्यातील मुख्य गावातील बाजार नागरिकांनी फुलून गेला होता. सकाळपासून नागरिकांची पावले बाजारपेठेत वळली होती. फुले, हार, हळद-कुंकू, पणती, अगरबत्ती पूजेचे साहित्य, आकाशकंदील, फटाके, तयार किल्ले, खेळणी- मावळे, रोषणाईचे माळा आदी साहित्य खरेदी जात होते. दुकानाबरोबरच रस्त्यावरील विक्रेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात या साहित्याची खरेदी केली जात गेली. याचबरोबर तयार फराळ आणि मिठाईला पसंती दिली जात होती. स्वीट मार्टमध्ये फराळाचा पाकीटांना मागणी वाढली आहे. मिठाई सोबतच सुका मेवाचे आकर्षक पाकीटे आणि बॉक्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. स्वीट मार्ट चालकांनी दुकानासमोर मांडव टाकून यांची स्वतंत्र केंद्र तयार केले होते. कपडे घेण्यासाठी रेडिमेड कापड दुकानात नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. बालगोपाळांचा उत्साह दांडगा होता. इलेक्ट्रॅनिक्स साहित्य खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले. एईडी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज आदी साहित्यांना मोठी मागणी होती. अलंकार खरेदीसाठी शहरातील सर्वच सराफी दुकानात ग्राहकांची गर्दी होती. दरम्यान, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे माहिती असूनही प्रशासकीय यंत्रणेने वाहन पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच ग्राहकांनीही रस्त्यावर वाहने उभी केली. अनेक दुकानदारांनीही रस्त्यावर मालकी हक्क सांगितल्याने ग्राहकांना त्रास झाला. गेल्या अनेक वर्षे येथे वाहतूककोंडीचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने ही समस्या कायम आहे. येथील वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)