शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: February 6, 2015 00:31 IST

दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत.

धनकवडी : दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत. अनेकांची रोजी-रोटी त्यावर अवलंबून असताना, या भागात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिक हैराण झाले आहेत.दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. विद्युतवाहिन्या भूमिगत केल्यापासून पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांमध्ये आर्द्रता जाण्यामुळे वारंवार विद्युत ाुरवठा खंडित होतो. मात्र सध्या कोणतीच परिस्थिती नसताना देखील वीज खंडित होण्यामुळे छोटे व्यावसायिक रस्त्यावर येण्याची व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांकडे जनरेटरची सुविधा असल्याने काम सुरु राहते. मात्र, सध्या सुरूअसलेल्या मंदीमुळे जनरेटर चालविणेदेखील परवडत नाही. या व्यावसायिकांकडून मोठ्या कंपन्यांना वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच कायम व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुणेकरांकडून जादा वीज आकार भरून देखील अशी परिस्थिती असल्याने व्यावसायिकांमध्ये महावितरणविषयी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वीजबिलांमधून अनेक प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यामानाने सेवा मिळत नाही. एखाद्या वेळी वीजबिल भरण्यास विलंब झाल्यास रीतसर जोड बंद केला जातो. याकडे ‘महावितरण’ने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनादेखील याबद्दल वीजजोड वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लाच प्रकरणातून एक वर्षापूर्वी चार वरिष्ठ अधिकारी एकाच दिवशी एकाच वेळी जाळ्यात सापडले होते. तरीदेखील अद्याप कारभार सुधारला असल्याचे दिसत नाही. वीज जोडणीसाठी कार्यालयात जमा केलेली फाईल धूळ खात पडते. ‘महावितरण’ कंपनीचे अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यात अकार्यक्षम असतील, तर त्यांची तत्काळ बदली करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तातडीने दखल न घेतल्यास व्यावसायिकही आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.(वार्ताहर)४स्थानिक महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याविषयी सक्षम यंत्रणा नाही. टोल फ्री नंबर असूनही त्याचे नियंत्रण मुंबईवरून होत असल्याने तक्रार दाखल होत नाही. ‘महावितरण’चे अधिकारी मोबाईल उचलतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तक्रार कोठे करायची, हा प्रश्न कायमच राहतो. तक्रारकेंद्र धनकवडीच्या कार्यालयात केल्यास या भागात तक्रार नोंदविता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. ‘महावितरण’ने असाच शॉक ऐन दहीहंडीच्या उत्सवात दिल्याने रात्री बारा वाजता धनकवडीकरांनी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.