अवसरी : गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवार, दि. २१ आॅगस्ट रोजी होत आहे. शिवसेनेने आपले सदस्य सहलीसाठी बाहेरगावी नेले आहेत. शिवसेना सदस्यसंख्या ६, राष्ट्रवादी काँग्रेस पाच सदस्यसंख्या असल्याने सरपंचपदासाठी शिवसेनेने छाया गावडे, तर उपसरपंचपदासाठी लता जारकर यांची नावे निश्चित केल्याची माहिती सरपंच देवराम गावडे यांनी सांगितले.गावडेवाडी सरपंचपदाची मुदत २० आॅगस्ट रोजी संपत असल्याने नुकतीच या गावात निवडणूक झाली. त्यात शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. येथील ग्रामपंचायत सदस्यसंख्या ११ आहे. मागील पाच वर्षे शिवसेनेची ग्रामपंचायतीवर सत्ता होती.शिवसेनेचे सहा सदस्य पुढीलप्रमाणे : छाया गावडे, केरभाऊ गावडे, लता जारकर, आशा तळेकर, संतोष गावडे, मयूर शिंदे.राष्ट्रवादीचे सदस्य पुढीलप्रमाणे : बाळासाहेब गावडे, बाबाजी टेमकर, ज्योती जारकर, कविता गावडे, वनिता गावडे. (वार्ताहर)
सरपंचपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत वाढतेय चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2015 00:06 IST