शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मताधिक्य; राष्ट्रवादीला धोका

By admin | Updated: May 20, 2014 04:55 IST

पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना तब्बल ५७ हजारांचे मताधिक्य मिळाले

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना तब्बल ५७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्या भागातील आमदार अण्णा बनसोडे हे राष्टÑवादी काँग्रेसचे असूनही लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे राहुल नार्वेकर यांना अल्प मते मिळाली. हे मताधिक्य राष्टÑवादीला धोक्याचे संकेत देणारे असून, राष्टÑवादीचे नेते स्थानिक पदाधिकारी यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे. दापोडी ते निगडीपर्यंतचे महापालिकेचे ४२ प्रभाग पिंपरी विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वाधिक २६ नगरसेवक आहेत. भाजपचा १, शिवसनेचे २, आरपीआय १ असे महायुतीच्या नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. आमदार राष्टÑवादीचे,नगरसेवकांची संख्या अधिक तरिही राष्टÑवादीची झालेली पीछेहाट विचार करायला लावणारी आहे. राष्टÑवादीची ताकद असूनही शिवसेनेच्या उमेदवारास ५७ हजारांचे मताधिक्य मिळते, हे राष्टÑवादी काँग्रेसला आगामी काळात घातक ठरू शकते. याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत. राष्टÑवादी काँग्रेसने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आगामी काळ त्यांना कठीण जाणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील या मतदार संघातील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तरी आगामी काळात काय संकट येईल, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. गत निवडणुकीत राष्टÑवादीच्या अण्णा बनसोडे यांना टक्कर देणारे अमर साबळे यांना दुसर्‍या क्रमांकांची मते मिळाली होती. त्या वेळी शहरवासीयांसाठी ते नवखे होते. आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना भाजपला आणखी अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. जागा वाटपात ही जागा भाजपकडे असणार आहे. साबळे आता या शहरासाठी नवखे राहिलेले नाहीत. या लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ६८ हजार ७६ पैकी १ लाख ७९ हजार ४६१ इतके मतदान झाले. शिवसेना-भाजप महायुतीचे बारणे यांना ९५ हजार ८८९ मते मिळाली. शेकापचे लक्ष्मण जगताप यांना ३८ हजार ३५९ इतकी आणि राष्टÑवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना तिसर्‍या क्रमांकाची २१ हजार ७१ मते मिळाली. बसपाचे टेक्सास गायकवाड यांना ६८९७, मते ‘आप चे मारुती भापकर यांना ८६२६ मते मिळाली. शिवसेनेचे बारणे यांना ५७ हजार ५३० मतांची आघाडी मिळाली. ही महायुतीसाठी जशी जमेची बाजू आहे, तशी पुढील काळात राष्टÑवादीसाठी तोट्याची ठरणारी आहे. झोपडपट्टीतील मतदान हे या मतदारसंघात निर्णायक मानले जाते. ते या वेळी महायुतीच्या बाजूने झाल्याने बारणे यांना आघाडी मिळण्यास मदत झाली. पक्षविरोधी काम करणार्‍यांची गय केली जाणार नाही, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी देऊनही काही फरक पडला नाही. राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार उमेदवार नार्वेकर यांच्या झोळीत अवघी २० हजार मते पडली. आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या विद्यमान आमदार बनसोडे यांच्यासह नगरसेवक जगदीश शेट्टी, गौतम चाबुकस्वार यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)