शिव सहकार सेना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा शिल्पा अतुल सरपोतदार यांनी प्रदीपकुमार खोपडे यांना मुंबई येथे निवडीचे पत्र दिले. या वेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, बारामती लोकसभा मतदार संघाचे संर्पकप्रमुख सत्यवान उभे, सचिन दगडे, बाळासो भांडे, शैलेश वालगुडे, शिवाजी उभे, हनुमंत कंक, गणेश उफाळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
राज्यतील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांची शिव सहकार सेनेच्या संर्पकप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. प्रदीप खोपडे यांनी यापूर्वी आंबाडे गावचे सरपंच, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम केले आहे.
प्रदीप खोपडे यांना संपर्कप्रमुख पदाचे पत्र देताना शिल्पा सरपोतदार, रवींद्र मिर्लेकर व इतर.