शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला मंदिराचा कळसच चोरला

By admin | Updated: April 28, 2017 05:50 IST

शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री रामलिंगमहाराज मंदिराचा कळस रात्री चोरीला गेला. सोन्याचा मुलामा दिलेला हा कळस आहे

शिरूर : शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री रामलिंगमहाराज मंदिराचा कळस रात्री चोरीला गेला. सोन्याचा मुलामा दिलेला हा कळस आहे. मात्र, मंदिराचा कळसच चोरीला गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. साडेतीन वर्षांपूर्वी याच मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली होती.शिरूरपासून तीन किलोमीटर अंतरावर शिरूर-भीमाशंकर रस्त्यावर रामलिंग महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. या मंदिराचा सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरीला गेल्याचे प्रथम सुरक्षारक्षक नामदेव दौंडकर यांना दिसले. त्यांनी ही बाब रामलिंग ट्रस्टचे विश्वस्त वाल्मीकराव कुरंदळे यांना कळविली. कुरंदळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या तसेच विजेच्या वायरी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी तोडल्याचे निदर्शनास आले. पहाटे एक ते चारच्या दरम्यान मंदिर परिसरात अंधार करून चोरट्यांनी चोरीच्या घटनेस अंजाम दिला. मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या खोलीवर चढून चोरट्यांनी प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.सीसीटीव्ही कॅमेरे हे मध्यरात्री दोन वाजून ५६ मिनिटांनी बंद झाल्याचे माजी सरपंच अरुण घावटे यांनी सांगितले. या दरम्यान चोरी झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. साडेतीन वर्षांपूर्वी चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूनेच प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन पसार झाले होते. गुप्तदान असल्याने त्यातील रकमेचा तपशील मिळाला नव्हता. दानपेटीतील रक्कम काढून दानपेटी तोडून फोडून मंदिराजवळ टाकून देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नसताना कळसच चोरीला गेल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.