शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने तिची ९ लाखांची फसवणूक, पोलिसांमुळे ९९ टक्के रक्कम मिळाली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : मुंबई, पुण्यातील मल्ट्री नॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने एका उच्च शिक्षित महिलेची सायबर चोरट्यांनी ९ ...

पुणे : मुंबई, पुण्यातील मल्ट्री नॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने एका उच्च शिक्षित महिलेची सायबर चोरट्यांनी ९ लाख २५ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली होती. सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करून या गुन्ह्यातील ९९ टक्के रक्कम गोठविली. न्यायालयात पाठपुरावा करून वेळेत रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे आदेश घेऊन फिर्यादीची ९ लाख १३ हजार ७०८ रुपये परत मिळवून दिले. सायबर क्राईममधील फसवणुकीतील ९९ टक्के रक्कम परत मिळविण्याचा बहुदा हा पहिलाच प्रकार आहे.

उच्च शिक्षित महिलेने नोकरीसाठी ऑनलाईन जॉब पोर्टलवर बायोडाटा अपलोड केला होता. फेब्रुवारी व मार्च २०२१मध्ये सायबर चोरट्यांनी या महिलेला वेगवेगळ्या मोबाईलवरून व बनावट डोमेन तयार करून बनावट ई-मेलचा वापर करून संपर्क साधला. पुणे, मुंबई येथील मल्टी नॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांना प्रत्येक वेळी रजिस्ट्रेशन फी, मुलाखतीकरिता फी, वैद्यकीय चाचणी फी, जॉब कन्फरमेशन, सिक्युरिटी आय डी, बाँड कन्फरमेशन, जीएसटी, टिडीएस, रिफंड प्रोसेस, फंड ट्रान्सफर अशी वेगवेगळी कारणे सांगून पेमेंट लिंकद्वारे त्यांना एकूण ९ लाख २५ हजार ३८० रुपये भरायला लावले. आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यावर सायबर पोलिसांनी तातडीने तांत्रिक विश्लेषण करुन या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. आरोपींच्या बँकांची माहिती प्राप्त करुन, ती बँक खाती गोठवली. त्यानंतर तातडीने न्यायालयात पाठपुरावा करून फसवणूक झालेल्या रकमेपैकी ९९ टक्के रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिली.

अनेकदा सायबर चोरटे हे एखाद्याने त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या बँक खात्यात पैसे भरले की ते तातडीने दुसऱ्या, तिसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करून नंतर काढून घेतात. त्यामुळे अनेक प्रकरणात फिर्यादी पोलिसांपर्यंत पोहोचणे व त्यांच्या रकमेचा माग काढेपर्यंत सायबर चोरट्यांनी बहुतांश रक्कम काढून घेतलेली असते. या प्रकरणात मात्र पोलिसांना यश आले आहे.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक निरीक्षक गणेश पवार, हवालदार अस्लम आत्तार, पोलीस अंमलदार मंगेश नेवसे, सोमनाथ भोरडे, योगेश वाव्हळ, प्रवीणसिंग राजपूत, शिरीष गावडे, अमोल कदम, उमा पालवे, पूजा मांदळे यांनी ही कामगिरी केली़

.....

नागरिकांनी सावध राहावे

ऑनलाईन पद्धतीने नोकरीचे, लॉटरीचे, बक्षिसाचे, कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून पैसे भरावयास लावणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा आमिषांना बळी पडू नये, अशा घटनांबाबत तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.