शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’चा रात्रीचा प्रवास धोक्याचाच!

By admin | Updated: May 5, 2015 03:21 IST

येरवडा पोलिसांकडे अशी एक तक्रार नुकतीच आली आहे. प्रवासात दोन बहिणींवर हा प्रकार ओढावला. त्याची हकीकत संबंधित मुलींनी चाईल्डलाईन हेल्पलाईनला कळवली.

येरवडा पोलिसांकडे अशी एक तक्रार नुकतीच आली आहे. प्रवासात दोन बहिणींवर हा प्रकार ओढावला. त्याची हकीकत संबंधित मुलींनी चाईल्डलाईन हेल्पलाईनला कळवली. त्याची गांभीर्याने दखल घेत चाईल्डलाईनने येरवडा पोलिसांकडे या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला. या घटनेमुळे पुण्यासह राज्यातील एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बसमध्ये महिलांची छेडछाडी होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.राज्याच्या विविध भागांमधून मुली, महिला शिकण्यासाठी, नोकरीसाठी पुणे-मुंबई किंवा शहरांकडे धाव घेतात. आपल्या गावी परतताना किंवा गावाहून शहराकडे येताना अंतराचे आणि वेळेचे गणित बसविण्यासाठी रात्रीची वेळ निवडली जाते. नोकरी-शिक्षणामुळे कुटुंब सोडून आलेल्या मुलींना कैकवेळा एकटीनेच प्रवास करावा लागतो. पण अनेकदा या एकट्या महिलेला रात्री बसमध्ये विनयभंग, छेडछाडीच्या प्रसंगांना, घाणेरड्या नजरा, लगट करण्याच्या प्रकाराला बळी जावे लागते. अनेकदा महिला इच्छितस्थळी उतरल्यानंतर आपल्यावर ओढावलेला प्रसंग गांभीर्याने घेत नाहीत व त्याबाबत तक्रारही नोंदवत नसल्याचे चित्र आहे. दुुर्दैवाने, बसमधील इतर प्रवासी या महिलांच्या मदतीसाठी पुढाकार घेत नसल्याचेही वास्तव आहे. याचा परिणाम म्हणजे बसचालक, वाहक, सहायक व काही पुरुष प्रवासी निर्ढावतात. आपल्याला विरोध होत नाही, तक्रार केली जात नाही याचा गैरफायदा घेऊन अशाच प्रकारे ते इतरही मुली-महिलांची छेड काढण्यास उद्युक्त होतात. अशाच घटनांतून त्यांचे धाडस वाढते आणि बलात्कारासारख्या घटना घडत आहेत.