शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ स्वीकारते ‘नकोशा’ झालेल्या देवतांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

पुणे : घराला नवा ‘लूक’ देताना देवघरांच्या संकल्पनाही बदलल्या. ‘मॉडर्न इंटेरियर’मध्ये देवतांच्या तसबिरी ‘सूट’ होईनात. मग, झाडांखाली, उकिरड्यावर, नाले ...

पुणे : घराला नवा ‘लूक’ देताना देवघरांच्या संकल्पनाही बदलल्या. ‘मॉडर्न इंटेरियर’मध्ये देवतांच्या तसबिरी ‘सूट’ होईनात. मग, झाडांखाली, उकिरड्यावर, नाले आणि नद्यांच्या पात्रांमध्ये त्या भिरकावल्या जाऊ लागल्या. ज्यांच्याकडे स्वप्ने पूर्ण करण्याच्या मनोकामना मागितल्या त्याच ‘नकोशा’ झालेल्या देवतांचा स्विकार करण्याची अनोखी चळवळ राज्यात उभी राहात आहे. या चळवळीतून आतापर्यंत जवळपास ८०० लोकांनी त्यांच्या घरातील नको असलेल्या तसबिरी आणि मूर्त्या दान केल्या आहेत.

पेशाने वकील असलेल्या अ‍ॅड. तृप्ती गायकवाड या तरुणीच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली. मुळच्या नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या रहिवासी असलेल्या तृप्ती घरची देवपुजा आणि सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य करतात. देवतांची ही विटंबना थांबविण्याबाबत ‘मेसेज’ तयार करुन मित्र-मैत्रिणींना पाठविला. लोकांकडून टाकाऊ वाटणाऱ्या तसबीरी, मूर्त्या स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘मेसेज’ सोशल मिडीयात व्हायरल झाला. अल्पावधीतच पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, औरंगाबादेतून प्रतिसाद मिळू लागला. या कामात इच्छूक असलेल्यांचा गट तयार झाला. विविध शहरातून जोडल्या गेलेल्यांची ‘टीम’ तयार झाली. फेसबुकवर ‘संपूर्णम’ नावाने पेज तयार करण्यात आले.

येवल्यातच ‘रिसायकलींग’चे काम सुरु करण्यात आले. तसबिरी-मुर्त्यांची उत्तरपुजा करुन त्याचे कागद, प्लास्टिक, लाकूड, लोखंड, पत्रा, प्लास्टर ऑफ पॅरिस असे वर्गीकरण केले जाऊ लागले. कागदाचा लगदा बनविणे, धातू आणि प्लास्टिक वितळवून त्याचे ब्लॉक तयार करणे, प्लास्टर ऑफ पॅरिसचा भुगा करुन त्यापासून वस्तू बनविण्याचे काम सुरु करण्यात आले. काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. परंतु, त्यांना महत्व पटवून देण्यात आले.

=====

दुसऱ्याची पिडा आपल्या घरात कशाला आणतेस, असे सुरुवातीला म्हणणारी आईदेखील या कामात सहभागी झाली. तृप्ती यांच्या होणाऱ्या पतीनेही या कामात सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

====

नाशिक-मुंबई-पुण्यामधून हे साहित्य गोळा करण्याची यंत्रणा ठरली आहे. एक गाडी त्यासाठी पाठविली जाते. ठरविलेल्या केंद्रावर लोक साहित्य आणून देतात. या केंद्रांवरुन हे साहित्य एकत्र केले जाते.