शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पवारसाहेबांचा शब्द खरा ठरला!

By admin | Updated: May 19, 2014 01:49 IST

सांगवीच्या सभेत ‘गद्दारांना धडा शिकवा, पैशांची मस्ती उतरवा’, अशी जळजळीत टीका जगतापांवर केली होती. ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे शब्द खरे ठरले.

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन शेकापकडून लढणार्‍या आमदार लक्ष्मण जगताप यांचा धक्कादायक पराभव झाला. मोदींची सुनामी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी घेतलेले वैर, अनधिकृत बांधकाम प्रश्नाविषयी मनसेचे राज ठाकरे यांनी केलेला पलटवार, प्रचाराचे उत्तम नियोजन व रसद पोहोचूनही न झालेला फायदा, स्वकीयांनीच दाखविलेले काम, केलेली जळजळीत टीका ही  जगताप यांच्या अपयशाची कारणे आहेत. सांगवीच्या सभेत ‘गद्दारांना धडा शिकवा, पैशांची मस्ती उतरवा’, अशी जळजळीत टीका जगतापांवर केली होती. ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे शब्द खरे ठरले. उपमुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून आमदार जगतापांची ओळख आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. ते स्थायी समिती निवडणूक, विषय समित्या, शिक्षण मंडळ निवडणुकीत दिसून आले आहे. सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसराचा नियोजनबद्ध विकास केल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून त्यांनी राजकीय शक्ती निर्माण केली होती. शिवसेनेतील खासदारालाच फोडून, त्यांचा एक गट, राष्टÑवादीची मोठी शक्ती मागे असताना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळवूनही अपयशास सामोरे जावे लागले. त्यांची राजकीय समीकरणे बिघडत गेल्याने त्याचा फटका त्यांना बसला. पराभवास सामोरे जावे लागले. जगताप यांच्या अपयशाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील - मावळ लोकसभेतून जगताप यांचे नाव जवळजवळ निश्चित असताना २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार पानसरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर बंड केले. पक्षविरोधी काम करणार्‍याला उमेदवारी मिळत असेल, तर राष्टÑवादीत राहण्यात अर्थ नाही, म्हणून आझम पानसरे यांनी राष्टÑवादीला राम राम ठोकला. त्यातच अनधिकृत बांधकाम प्रश्न सुटला, तरच लोकसभा लढणार अशी भूमिका जगताप यांनी घेतली होती. आचारसंहिता लागली, तरी राज्य सरकारने प्रश्न सोडविला नाही म्हणून जगताप यांनी राष्टÑवादी काँग्रेसने देऊ केलेली उमेदवारी नाकारली. गेल्या लोकसभा निवडणुकीत घाटाखाली शेतकरी कामगार पक्षाची जादू चालली होती. या निवडणुकीतही ती चालेल, असा विश्वास जगताप यांना होता; मात्र घाटाखालील दोनच मतदारसंघांत त्यांना यश मिळाले. २००९ च्या विधानसभेत अपक्ष असतानाही राष्टÑवादी काँग्रेसचा भक्कमपणे पाठिंबा होता. स्थानिक नेते अप्रत्यक्षपणे पाठीशी होते. मात्र, या वेळी राष्टÑवादीने शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत चिंचवड आणि पिंपरी विधानसभेतील स्थानिक नेते उघडपणे भाऊंच्या पाठीशी होते. मात्र, त्यांनी मनापासून काम केलेले नसल्याचे दिसून येते. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या गोटात असणारे बरेचसे कार्यकर्ते दुखावले गेल्याने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपली शक्ती दाखवून दिली. दुसरी गोष्ट म्हणजे राष्टÑवादीचे वर्चस्व असणार्‍या पिंपरी, चिंचवड, मावळ भागात मतांचे विभाजन झाले. ज्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न घेऊन जगताप यांनी दोनदा आमदारकीचा राजीनामा दिला, त्या राजकीय भांडवलाचा काहीही फायदा झाला नाही. तसेच उमेदवारी नाकारल्यापासून ते राष्टÑवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्टÑवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर विखारी टीका केली. सांगवीच्या सभेत अध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांवर तोफ डागली होती. अत्यंत त्वेषाने बोलत होते. ‘पैशांचा दर्प चढला की माणूस हवेत जातो. तो अहंकाराचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. गद्दारांना धडा शिकवा. पैशाची मस्ती जिरवा, अशी टीका केली होती. गेल्या काही वर्षांतील साहेबांचे हे भाषण अत्यंत विखारी होते, उपमुख्यमंत्र्यांनी पक्षविरोधी काम करणार्‍यांना १६ मे नंतर पाहून घेऊ, गाठ माझ्याशी आहे, असा दम दिला होता. (प्रतिनिधी)