शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महादेवन यांनीही धरला ताल

By admin | Updated: July 20, 2015 03:30 IST

आपल्या सुरांनी तमाम भारतीयांना वेड लावणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तरुणांसह लहान-थोरांनी

पुणे : आपल्या सुरांनी तमाम भारतीयांना वेड लावणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तरुणांसह लहान-थोरांनी एकच गर्दी केली होती. पुण्याची नवी ओळख असलेल्या ढोल पथकासोबत महादेवन तरुणांतीलच एक होऊन गेले. तरुणांसोबत ताशा वाजवत त्यांनी आपल्यातील संगीतकाराची प्रत्यक्ष ओळखच पुणेकरांना करुन दिली. वंदेमातरम् संघटनेच्या युवा वाद्य पथकातर्फे ढोलताशा पथकातील वाद्यांचे पूजन रविवारी महादेवन यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. या वेळी सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई व युवा वाद्य पथकाचे प्रमुख वैभव वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. आपले करिअर आणि व्याप सांभाळून ढोलवादनाच्या निमित्ताने एकत्र आलेला तरुणवर्ग संगीताच्या माध्यमातून रसिकांना आनंद देत आहे. तरुणांची ही एकप्रकारची संगीत साधनाच आहे. जगात होणाऱ्या विविध महोत्सवात तेथील पारंपरिक वाद्ये वापरली जातात. तेव्हा महाराष्ट्रात ढोल या आपल्या पारंपरिक वाद्याचा वापर व्हायला काय हरकत आहे, असा प्रश्न महादेवन यांनी उपस्थित केला. मुलांच्या बरोबरीने मुलींचा वादनातील वाढता सहभाग हाही लक्षणीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शहरात दिवसेंदिवस पथकांची संख्या वाढत असली तरीही वादकांच्या मनात वाद्याबद्दल असणारी निष्ठा एकच असते. या उद्देशाने हे वाद्यपूजन करण्याचे ठरविल्याचे पथकाचे प्रमुख वैभव वाघ यांनी सांगितले.