शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाहन तोडफोडप्रकरणी सात जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 01:58 IST

दगडू पाटीलनगर भागात धुडगूस घालणाऱ्या दोन टोळ्यांमधील आरोपींविरोधात वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला

वाकड : थेरगावात कैलासनगर आणि दगडू पाटीलनगर भागात धुडगूस घालणाऱ्या दोन टोळ्यांमधील आरोपींविरोधात वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, दोन्ही गटांतील सात जणांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या घटनेत सुमारे २२ वाहनांची तोडफोड करून सुमारे ९५ हजारांचे नुकसान झाले आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष ऊर्फ सोनू विजय गोयर (वय २१, रा. थेरगाव), गौतम गुलाब दळवी (वय १९, हिंजवडी),ऋषीकेश महादेव चव्हाण (वय १९,थेरगाव), गणेश सुरेश गेजेगे (वय २२,थेरगाव) या चार आरोपींना अटक करण्यात आली. भावड्या ऊर्फ प्रवीण हिरामण खरात (तापकीरनगर, काळेवाडी) या आरोपीसह चार अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी महिलेच्या घराजवळ दगडू पाटीलनगरमध्ये शुक्रवारी रात्री दगड,विटा; तसेच काठ्या, कोयते घेऊन काहीजण जमले. त्यांनी फिर्यादी महिलेच्या घरासह आजूबाजूच्या घरांवर दगडफेक केली. एकाने महिलेला जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयता फेकून मारला. कोयत्याचा वार त्या महिलेने हुकविल्याने इजा झाली नाही. तसेच दुसरी फिर्याद पवन खलसे (वय २३, कैलासनगर, थेरगाव) याने दाखल केली असून, या फिर्यादीमुळे सचिन वसंत खलसे (वय २३, बापुजीनगर, थेरगाव), ईश्वर किसन गायकवाड (वय २५, जगतापनगर, थेरगाव) या दोन आरोपींना अटक केली आहे; तर तीन आरोपी फरार आहेत. फिर्यादी पवन खलसे मोटारीत ठेवलेला लॅपटॉप घेण्यास गेले. त्या वेळी आरोपींनी दुचाकीवर येऊन त्या ठिकाणी दगडफेक केली. वाहनांचे नुकसान केले. (वार्ताहर)>इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने आरोपींनी एक दगड फिर्यादीच्या दिशेने फेकला. तो जवळ उभ्या असलेल्या मोटारीवर पडला. कैलासनगर, तसेच तापकीरनगर भागात रस्त्यावर उभ्या केलेल्या १४ वाहनांच्या काचा फोडल्या. सुमारे ६० ते ६५ हजारांचे नुकसान केले. त्या ठिकाणी उभे असलेले प्रत्यक्षदर्शी किशोर तायडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार मारली. तलवारीचा वार चुकविल्याने ते बचावले. दोन्ही गटांतील आरोपींवर भारतीय दंडसंहिता, तसेच मुंबई पोलीस अधिनियम आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बेकायदा जमाव जमविणे, प्राणघातक हल्ला करणे, मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.