शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘पीपीपी’च्या भरवशावर साडेसात हजार कोटींचे ‘इमले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST

पुणे : पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना अवास्तव वाढ करीत हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ...

पुणे : पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना अवास्तव वाढ करीत हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये शाश्वत उत्पन्नापेक्षा खासगी भागीदारीसह सामाजिक दायित्वामधून (सीएसआर-सीईआर) विकसनाच्या (पीपीपी) कामांवर अधिक भर देण्यात आला आहे. पालिकेच्या अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्यासोबतच मिळकतकर आणि बांधकाम परवानगीमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविण्याचा भरवसा आयुक्त कुमार यांनी या वेळी व्यक्त केला. आयुक्तांचे अंदाजपत्रक फुगविलेले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, आरपीआयच्या गटनेत्या सुनीता वाडेकर, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, डॉ. कुणाल खेमनार, सुरेश जगताप, मुख्य लेखापरीक्षक उल्का कळसकर आदी उपस्थित होते.

गेल्या तीन चार वर्षांत उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढविण्यात अपयश आलेले आहे. त्यातच पालिकेचे अंदाजपत्रक तब्बल साडेसात हजारांच्या पुढे गेल्याने स्थायी समितीचेही अंदाजपत्रक वाढणार आहे. गेल्या वर्षी आयुक्तांनी ६ हजार २२९ कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. त्यामध्ये यंदा तब्बल १४२१ कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालिकेला जानेवारीपर्यंत मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा ३ हजार २५० कोटींच्या घरात आहे. पालिकेचे उत्पन्न मार्च अखेरीस साडेचार हजारापर्यंत जाईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. उत्पन्नात आणखी एक हजार कोटींची वाढ झाली तरी पालिकेला तीन हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे.

====