शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

तक्रारींचे गांभीर्य मोठे; कारवाई शून्यच

By admin | Updated: July 27, 2015 03:45 IST

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये शेकडो महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी ७

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये शेकडो महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी ७ सदस्यीय महिला तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. पालिकेतील अनेक महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या गैरवर्तनाचा त्रास सहन करावा लागत असला तरी प्रत्यक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या खूप कमी आहे. समितीकडे तक्रार दाखल करू इच्छिणाऱ्या महिलांना त्यांची समजूत घालून अर्ज करू नये याकरिता तिला प्रवृत्त केले जाते. अगदी अर्ज दाखल झाल्यानंतरही अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार घडत आहेत.दरवर्षी साधारणत: अधिकृतपणे ५ ते ६ तक्रारी पालिकेतील या समितीकडे दाखल होत आहेत. मात्र या तक्रारींचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी, डॉक्टर, शिक्षिका, क्लार्क, झाडलोट, बिगारी काम करणाऱ्या महिला यांच्याकडून या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी, मुकादम, रखवालदार, ड्रायव्हर, मेहतर म्हणून काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांविरुद्ध या तक्रारी आहेत. घटस्फोटित, विधवा, एकट्या असलेल्या महिलांना पुरुष सहकाऱ्यांच्या त्रासाला विशेष करून सामोरे जावे लागत आहे. अश्लील बोलणे, जाणूनबुजून स्पर्श करणे, शरीरसुखाची मागणी करणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. तीन महिन्यांच्या आत महिलेची तक्रार निकाली काढण्याचे बंधन समितीवर आहे; मात्र प्रत्यक्षात या तक्रारींवर सुनावणी अनेक महिने सुरू राहते. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतरही केवळ वेतनवाढ रोखण्याची किरकोळ स्वरूपाची कारवाई समितीकडून केली गेली आहे. वस्तुत: नियमानुसार समितीकडे तक्रार आल्यानंतर सुनावणी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक आहे. पीडित महिलेला जर रजेची आवश्यकता असेल तर तिला भरपगारी रजा उपलब्ध करून देणे तसेच तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला निलंबित करणे किंवा कामावरून काढून टाकणे इतपत अधिकार समितीला आहेत. राजस्थानमध्ये १९९७ साली एका गावात भवरीदेवी नावाच्या समाजसेविकेने सरपंचाच्या मुलाचा बालविवाह थांबवला होता. त्याचा राग मनात धरून त्या सरपंचाने या समाजसेविकेवरच सामूहिक बलात्कार केला. या गंभीर घटनेची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. दिल्लीच्या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन उंबरठ्याबाहेर पडणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी समिती नेमावी, असे सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे महिला संरक्षणासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. तेव्हापासून देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे.