शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

गंभीर दरोड्यांचे तपास अद्यापही प्रलंबितच

By admin | Updated: October 5, 2015 02:02 IST

शहरात खळबळ माजवणाऱ्या अनेक खुनांचा तपास प्रलंबित असतानाच अनेक दरोड्यांचा तपासही अद्याप लागू शकलेला नाही.

पुणे : शहरात खळबळ माजवणाऱ्या अनेक खुनांचा तपास प्रलंबित असतानाच अनेक दरोड्यांचा तपासही अद्याप लागू शकलेला नाही. किचकट आणि गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या ‘इच्छाशक्ती’चा प्रश्न निर्माण झाला आहे. दरोड्यांच्या प्रलंबित तपासासाठी तसेच दरोड्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक पथक कार्यरत आहे. परंतु या पथकालाही चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. सातारा रस्त्यावरील रॉयल आर्केडचा दरोडा, लक्ष्मी रस्त्यावरील पोरवाल ज्वेलर्सचा दरोडा आणि कोरेगाव पार्क भागात दागिन्यांच्या दुकानावर पडलेला सशस्त्र दरोडा ही अलीकडच्या काळातील उदाहरणे आहेत. सातारा रस्त्यावरच्या रॉयल आर्केड या सोसायटीवर सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी टाकलेला दरोडा आजही पुणेकरांच्या मनामध्ये ताजा आहे. १४ सप्टेंबर २०११ मध्ये घडलेल्या या घटनेच्या आठवणीनेही पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहतो. सोसायटीमध्ये मध्यरात्री घुसलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांनी हल्ला चढवला. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात अणकुचीदार रॉडने घाव लावून दुसऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत एकूण पाच पोलीस गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्या क्षणी पकडलेल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी पळून गेलेले दरोडेखोर परत आले आणि पोलिसांना पुन्हा मारहाण करून त्याला सोडवून पळवून नेले. पोलीस दलासह पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा तपास लावण्यात मात्र पोलीस अपयशी ठरले. वास्तविक ही घटना पोलिसांनी आव्हान म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता होती. कापड आणि सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या विजय मारोती चौकामध्येही चार सशस्त्र दरोडेखोरांनी पोरवाल ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा घातला होता. १३ जुलै २०१२ रोजी पडलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल अडीच किलो सोने, पाच किलो चांदी आणि दीड लाख रुपये लंपास केले होते. बंदुकीच्या धाकाने झालेली ही लूट उघडकीस आणण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले. दुकानात घुसलेल्या चार जणांनी त्यांचे हातपाय बांधून हा ऐवज लंपास केला होता. जंग जंग पछाडलेल्या पोलिसांच्या हाती मात्र काहीही लागू शकले नाही.कोरेगाव पार्क या गजबजलेल्या आणि उच्चभ्रू वस्तीमधील पीएमजी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याचा तपास अद्यापही अधांतरीच आहे. येथील लेन क्रमांक सहामध्ये असलेल्या पीएमजी जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलर्स या सराफी दुकानावर चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकत तब्बल १ कोटी ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.