शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या मोबाईलची रस्त्यावर विक्री?

By admin | Updated: May 24, 2014 05:13 IST

गावाकडे जायचे आहे, बसभाड्यासाठी पैसे नाहीत, अडचणीत आहोत, असे सांगून आपल्याकडील मनगटी घड्याळ, रेडिओ, कॅमेरा घ्या; पण थोडे पैसे द्या, अशी विनवणी करणार्‍या महिला नेहमी दिसून येत असत.

पिंपरी : गावाकडे जायचे आहे, बसभाड्यासाठी पैसे नाहीत, अडचणीत आहोत, असे सांगून आपल्याकडील मनगटी घड्याळ, रेडिओ, कॅमेरा घ्या; पण थोडे पैसे द्या, अशी विनवणी करणार्‍या महिला नेहमी दिसून येत असत. पाचशे रुपये किमतीचे घड्याळ अवघ्या दोनशे रुपयांना देण्यास तयार आहोत, असा आगळावेगळा मार्केटिंग फंडा वापरून निकृष्ट दर्जाची वस्तू गळ्यात मारली जात असे. तोच फंडा वापरून आता भर रस्त्यात अशाच पद्धतीने ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल विकले जात आहेत. ते मोबाईल चोरीचे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे खेड्यातील महिलेचा पेहराव असलेली महिला आपल्या लहान मुलीसमवेत मोबाईल विक्री करत असल्याचे आढळून आले. गावाला जाण्यासाठी बसभाड्याचे पैसे नाहीत. अडचण आहे. आमच्याकडे मोबाईल हँडसेट आहे, तो घेऊन पैसे द्या. बाजारपेठेत तीन ते चार हजार रुपये किंमत असलेला मोबाईल तुम्ही एक हजारात घ्या, अशी विनवणी करीत असल्याचे गुरुवारी निदर्शनास आले. ही महिला शक्यतो महाविद्यालयीन तरुण-तरुणी दिसल्यानंतर त्यांच्याजवळ जाते. त्यांना ही नेहमीची कॅसेट वाजवून मोबाईल घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होती. ब्रॅँडेड कंपनीचे चार ते पाच हजार रुपये किमतीचे मोबाईल अवघ्या एक हजारात मिळत असल्याने त्या महिलेजवळ गर्दी झाली. गावाला जायचे आहे. बसभाड्याला पैसे नाहीत, ही अडचण दूर करण्यासाठी आपल्याकडील एखादा मोबाईल कमी किमतीला विकणे समजण्यासारखे आहे. परंतु एकापेक्षा अनेक व्यक्ती मोबाईल घेण्यास आल्यानंतर पिशवीतून अनेक मोबाईल काढले जाऊ लागले, तेव्हा ही महिला अडचणीत नसून अडचणीत आणू शकते, हे काहींच्या लक्षात आले. हँडसेट घ्यायचा असेल, तरी दुकानात डमी मॉडेल दाखवले जाते. बॉक्स उघडून मोबाईल हँडसेट हातात दिला जात नाही. कमीत कमी किमतीचा, तसेच महागडा मोबाईलसुद्धा हातात दिला जात नाही. खरेदी करणार असाल, तरच बॉक्स उघडून हँडसेट दाखवतो, असे दुकानदार अथवा सेल्समन सांगतो. मोबाईल खरेदीच्या तयारीने खिशात पैसे घेऊन गेले असले, तरी जोपर्यंत मोबाईल घेण्याबद्दल ग्राहक निश्चितपणे सांगत नाही. तोपर्यंत पाहण्यासाठीसुद्धा दुकानदार त्याच्या हातात मोबाईल देत नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकांमध्ये मात्र किमती मोबाईल, भाजीच्या दराप्रमाणे कमी किमतीचा दर ठरवून मोबाईल खरेदी करता येतो. ही बाब कमी किमतीत मोबाईल घेण्यास गेलेल्यांना खटकली. चोरीचा मोबाईल असावा, अशी शंका काहींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)