शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू

By admin | Updated: December 16, 2014 04:19 IST

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ ची पोटनिवडणूक १८ जानेवारी २०१५ ला होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

पिंपरी : महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ ची पोटनिवडणूक १८ जानेवारी २०१५ ला होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्याचे काम विविध राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने १७ ते २० डिसेंबर या कालावधित इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. जिजामाता प्रभागाची पोटनिवडणूक लढल्यास केवळ अडिच वर्षे नगरसेवक म्हणुन काम करण्याची संधी मिळणार आहे. थोडया अवधीकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठीही खर्च तेवढाच करावा लागणार असल्याने नगरसेवक होण्याची इच्छा असूनही पुढे येण्यास कोणी तयार होत नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, परंतू लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या बाजुने मतदारांनी कौल दिला आहे. ही स्थिती डोळ्यासमोर असताना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे अवघड जावू शकते. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांनी इच्छेला मुरड घातली आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या भागाचे नगरसेवक म्हणुन काम केले आहे. रिक्त जागेवर बंधू सुनील चाबुकस्वार यांना संधी मिळावी, अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. परंतू शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तीला संधी द्यायची आहे. भाजपला महापालिका पोटनिवडणुकीत या अनुकुल परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे. परंतू या प्रभागात कोण उमेदवार द्यायचा यासाठी त्यांना चाचपणी करावी लागणार आहे. एकुणच राजकीय पक्षांना जिजामाता प्रभागासाठी उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)