शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषिक’ पाहण्यासाठी परराज्यातूनही गर्दी

By admin | Updated: January 23, 2017 02:16 IST

माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरलेल्या कृषिक प्रदर्शनात चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

बारामती : माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरलेल्या कृषिक प्रदर्शनात चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विविध राज्यांतूून आलेले शेतकरी, परदेशी पाहुणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून आलेले शेतकरी आदींनी या प्रदर्शनास भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांना आधुनिक स्वयंचलित यंत्रणेच्या साहाय्याने पाण्याचा व खताचा योग्य प्रमाणात वापर कसा करावा, याची माहिती मिळाली. डच तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, रोपे तयार करण्यासाठी कलम तंत्रज्ञानाचा वापर, उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृह, शेडनेट हाऊस प्रात्यक्षिक, उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, काढणीपश्चात तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती, स्वयंचलित हवामान केंद्र याबाबत शेतकऱ्यांनी माहिती घेतली. ट्रस्टच्या डेअरी विभागातर्फे सर्फेस टँकमध्ये मुरधास बनवण्याचे तंत्रज्ञान, बॅगमध्ये मुरघास बनविणे, मुक्तसंचार गोठा पद्धती, आॅस्ट्रेलियन बोअर शेळ्या, दोन पिल्ले देणाऱ्या नारीसुवर्णा मेंढ्या, गवताचे बेल बनविण्याची मशिन, शेतातील पाचट गोळा करण्याची मशीन, मका व कडवळ चारा पिकांची कापणी करणारी मशिन इत्यादींचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.सेंद्रिय परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला डाळिंब प्रात्यक्षिक प्लॉट पाहून शेकडो शेतकरी आश्चर्यचकित झाले होते. विविध भागांतील शेतकऱ्यांनी डांळिब, द्राक्ष, केळी निर्मितीक्षम दर्जा तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली. कृषिक प्रदर्शनाचे आयोजन अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी केले होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शाकिर अली सय्यद, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांसह विविध विभागप्रमुख, कर्मचारी यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)