शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा आढावा घेऊनच बीआरटीबाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:02 IST

गर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत

पुणे : नगर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे या सुधारणा झाल्यानंतर येत्या २४ मे रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊन त्यानंतरच नगर रस्ता बीआरटी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पीएमपी प्रशासनाकडून हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करण्यात आली असली तरी आढावा बैठकीनंतरच या बाबत अंतिम निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यात आल्यापासून गेल्या २0 दिवसांत या मार्गावर १५हून अधिक लहान-मोठे अपघात झाले असून, एका ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावा लागला आहे. त्यातच ही अपघातांची मालिका सुरूच असून, सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत आहे. त्यामुळे नगर रस्ता बीआरटीला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, हा मार्ग सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करावा अशी मागणी करणारे पत्र पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी (दि. २0) महापालिका आयुक्तांना दिले आहे. याबाबत बोलताना कुमार म्हणाले, की पीएमपीकडून या मार्गावर काही तातडीच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पादचारी मार्गाजवळ गतिरोधक उभारणे, चौकांमध्ये वॉर्डन तसेच वाहतूक पोलीस नियुक्त करणे, यासह आणखी काही उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच पीएमपीकडून अपघातांची कारणे तसेच उपाययोजनांची माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गाबाबत आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतरही अपघात अथवा सुधारणा कमी वाटत असल्यास हा मार्ग बंद करण्याचा अंतिम निर्णय घेणार आहेत.